पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsWI : पाँटिंग-धोनीचा विक्रम धोक्यात, विराटकडे सुवर्ण संधी

विराट कोहली

विराटच्या नेतृत्वाखाली विंडीज दौऱ्यावरील टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत विजय संपादन केल्यानंतर भारतीय संघ आता कसोटीसाठी सज्ज झाला आहे. विंडीज विरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत विराट कोहलीला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगचा विक्रम मागे टाकण्याची संधी आहे.  

ऑस्ट्रेलियन संघाच्या नेतृत्वाची धूरा सांभाळताना रिकी पाँटिंगने १९ शतके झळकावली आहेत. कोहलीने भारताचे नेतृत्व करताना आतापर्यंत १८ शतके ठोकली आहेत. विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात विराटने शतकी खेळी केली तर तो रिकी पाँटिंगच्या विक्रमाशी बरोबरी करेल. या कसोटी मालिकेत विराटकडे पाँटिंगला मागे टाकण्याची सुवर्ण संधी आहे. 

विराटचे अव्वल स्थान संकटात, स्मिथकडून मिळतंय आव्हान

याशिवाय विराटला धोनीचा आणखी एक विक्रम खुणावत आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ६० पैकी २७ कसोची सामन्यात विजय मिळवला आहे. विंडीजविरुद्धचा सामना जिंकून विराटला धोनीच्या या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने ४६ कसोटी सामन्यात २६ विजय नोंदवले आहेत. गुरुवारपासून विंडीज आणि भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:india vs west indies test championship virat kohli eyes ricky pontings elite test record against windies