पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsWI : रविवारच्या दिवशी पराभवाचा 'चौकार' रोखण्याचं आव्हान

श्रेयस अय्यर

वेस्ट इंडिज विरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील विशाखापट्टणममधील दुसरा सामना जिंकत टीम इंडियानं मालिकेत १-१ बरोबरी साधली.  रविवारी कटकच्या मैदानात दोन्ही संघात मालिका विजयाची लढाई पाहायला मिळणार आहे. रविवारचा दिवस भारतीय संघासाठी फारसा समाधानकारक राहिलेला नाही. रविवारी झालेल्या बऱ्याचशा सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. 

Video: IPL मध्ये कोट्यवधी उगाच मिळाले नाहीत हे मॅक्सवेलनं दाखवून दिलं

वेस्ट इंडिज विरुद्ध चेन्नईच्या मैदानात एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना हा रविवारी खेळवण्यात आला होता. या सामन्यात भारतीय संघाला पाहुण्या संघाने ८ गड्यांनी पराभूत केले होते. त्यामुळे रविवार धमाकेदार खेळ दाखवून मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने विराट सेना मैदानात उतरेल. भारताने या वर्षातील २७ एकदिवसीय सामन्यातील रविवारी खेळलेले ३ सामने गमावले आहेत. यंदाच्या वर्षी १० मार्चला रविवारी भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारच्या दिवशी मोहालीत झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विराट ब्रिगेडला ४ गड्यांनी पराभूत केले होते.

IPL 2020: 'काय पो छे' मधील बीडचा कलाकार मुंबई इंडियन्सकडून खेळणार

इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकात ३० जूनला बर्मिंघमच्या मैदानात भारताला न्यूझीलंडकडून ३१ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. विश्वचषक स्पर्धेतील विजेता म्हणून भारतीय संघाकडे पाहिले गेले. मात्र रविवारी रंगलेल्या सामन्याने भारताच्या पदरी मोठी निराशा आली. त्यानंतर सध्या सुरु असलेल्या मालिकेत सलामीच्या सामन्यात विंडीजने भारताला ८ गडी राखून पराभवाचा दणका दिला. रविवारचा हा इतिहास खोडून काढत टीम इंडियाला मालिका जिंकण्याचे आव्हान असेल. 

एक पाऊल पुढे!, राहुल द्रविडच्या मुलाचं खणखणीत द्विशतक

सलामीचा सामना गमावल्यानंतर विशाखापट्टणमच्या मैदानात भारतीय संघाने फलंदाजी, गोलंदाजीसह क्षेत्ररक्षणामध्ये कमालीची कामगिरी दाखवत मालिकेत बरोबरी साधली. फलंदाजीत रोहित शर्मा, लोकेश राहुल यांनी लक्षवेधी खेळी केल्यानंतर फिरकीपटू कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी यांनी मोक्याच्या क्षणी विंडीजला धक्के देत सामना भारताच्या बाजूने वळवल्याचे पाहायला मिळाले होते. या सामन्यात श्रेयस अय्यरने शिम्रॉन हेटमायरला अप्रतिमरित्या धावबाद करत तंबूचा रस्ता दाखवला. ही विकेट देखील भारताच्या विजयाचा मार्ग सुकर करण्यास फायदेशीर ठरली होती.  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:india vs west indies team india take on west indies on sunday in decider here is full record