पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsWI T20 : धोनीचा खास विक्रम मागे टाकण्याची पंतकडे संधी

धोनी आणि पंत (संग्रहित छायाचित्र)

महेंद्रसिंह धोनीचा वारसदार समजला जाणारा ऋषभ पंत यष्टिमागे आणि फलंदाजीमध्ये चाचपडताना दिसतोय. पंतच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना विराट कोहलीने पंतचे समर्थन करत विंडीजविरुद्धच्या सामन्यात पंतला संधी मिळणार असल्याचे संकेत दिले आहेत. विराटने पंतच्या क्षमतेवर विश्वासही व्यक्त केलाय. आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवून सातत्याने मिळणाऱ्या संधीचं सोन करण्याच्या इराद्यानेच पंत विंडीज विरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरेल.  

INDvsWI T20 : पंतला संधी मिळणार का? विराटनं दिलं सॉलि़ड उत्तर

या सामन्यात चांगली कामगिरी करुन पंतला धोनीचा विक्रम मागे टाकण्याची संधी आहे. भारत आणि विंडीज यांच्यात सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम पंतला आपल्या नावे करण्याची संधी आहे. सध्याच्या घडीला हा विक्रम महेंद्रसिंह धोनीच्या नावे आहे. विंडीज विरुद्ध ७ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात पंतने ३ गड्यांना तंबूचा रस्ता दाखवलाय. धोनी ७ सामन्यात ५ गडी बाद करुन आघाडीवर आहे.

'गब्बर'ला बीसीसीआयकडून 'जबराट' शुभेच्छा!

विंडीजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत पंतला धोनीचा हा विक्रम मागे टाकण्याची संधी आहे. हैदराबादमध्ये होणाऱ्या सलामीच्या सामन्यात पंत हा पराक्रम करुन दाखवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेपासून पंतला सातत्याने संधी मिळत आहे. पण तो आपली क्षमता सिद्ध करण्यात अयशस्वी ठरतोय. त्याच्यावर टीका देखील करण्यात येत आहे. याकडे दुर्लक्ष करुन त्याला आपल्यातील क्षमता सिद्ध करावी लागणार आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:india vs west indies t20i series 1st t20 international match Rishabh Pant Set to Surpass MS Dhoni s Record in T20Is Against West Indies