पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पूरनच्या विकेटनंतर जल्लोष करणं सैनीला महागात पडलं

नवदीप सैनी

India vs West Indies T20I Series Navdeep Saini: वेस्टइंडिज विरुद्धच्या टी-२० सामन्यात पदार्पणात दमदार कामगिरी करणाऱ्या सैनीवर आयसीसीने नियमाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला आहे. पहिल्या टी-२० सामन्यातील सामनावीर सैनीच्या नावावर एका डिमेरिट गुणांची नोंद झाली असून  मैदानात प्रतिस्पर्धी खेळाडूविरुद्ध आक्रमक अंदाजात सिलेब्रेशन करु नये, असे आयसीसीने बजावले आहे. 

पदार्पणात सामनावीर ठरलेला सैनी कधी २५०-५०० रुपये मानधनावर खेळायचा

नवदीप सैनीने आयसीसी कोड ऑफ कंडक्ट लेव्हल वनचे उल्लंघन केले आहे. फ्लोरिडामध्ये रंगलेल्या पहिल्या सामन्यात निकोलस पूरनला बाद केल्यानंतर त्याने साजरा केलेला आनंद हा आयसीसीच्या नियमाचे उल्लंघन करणारा ठरवण्यात आला आहे. पहिल्या टी-२० सामन्यातील विंडीजच्या डावातील चौथ्या षटकात सैनीने २० धावांवर खेळणाऱ्या पूरनला ऋषभ पंत करवी झेलबाद केले. त्यानंतर त्याने आक्रमक अंदाजात आनंद व्यक्त केला होता. 

WI vs IND:पावसाच्या साथीनं भारताने सामन्यासह मालिका जिंकली

सैनीने देखील आपली चूक मान्य केली आहे.  पहिल्या टी-२० सामन्यात भारताने ४ गडी राखून विजय मिळवला होता. या सामन्यात सैनीने सर्वोत्तम कामगिरी करत विजयात मोलाचा वाटा उचलला होता. सैनीने १७ धावा खर्च करत ३ बळी टिपले होते.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: india vs west indies t20 international series navdeep saini found guilty of breaching the icc code of conduct during-1st t20 match