भारत आणि विंडीज यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला चेन्नईच्या मैदानातून सुरुवात झाली. विंडीजचा कर्णधार किरॉन पॉलार्डने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. विंडीज गोलंदाजांनी कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत भारताला सुरुवातीला धक्के दिले.
INDvsWI, 1st ODI : सलामीच्या सामन्यातील सर्व अपडेट्स एका क्लिकवर
सलामीच्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार विराट कोहलीने सलामीला लोकेश राहुलला संधी दिली. मयांक अग्रवालच्या ऐवजी त्याला संघात स्थान मिळाले आहे. याशिवाय शिवम दुबेही एकदिवसीय संघात पुनरागमन करत आहे. या सामन्यात केदार जाधवला देखील संधी देण्यात आली आहे. चहलच्या जागी त्याला संधी देणे क्रिकेट चाहत्यांना अयोग्य वाटते.
माजी विकेटकीपर मार्क बाऊचर द. आफ्रिकेचे नवे कोच
Disappointed to see jadhav.
— KABIR (@AsliJP) December 15, 2019
सोशल मीडियावर संघ निवडीच्या या निर्णयावर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. युजवेंद्र चहलऐवडी केदार जाधव कशाला? असा प्रश्न नेटकरी उपस्थित करण्यात येत आहेत. शिवम दुबेने टी-२० मालिकेत दमदार कामगिरी करुन दाखवली होती. सुरुवातीच्या धक्क्यानंतर शिवम दुबे संधीचं सोनं करण्यात यशस्वी ठरतोय का? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल. याशिवाय केदारलाही स्वत:ला सिद्ध करण्याचे आव्हान असेल.
Jadhav ko kis khushi mein khila rahe ho? Play both Kuldeep and chahal.
— BJ (@iBhaveshhh) December 15, 2019