पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : हेटमायरचा सुपरहिट सिक्स, विराटही झाला अवाक्

शिम्रॉन हेटमायर

कॅरेबियन ताफ्यातील युवा फलंदाज शिम्रॉन हेटमायरने चेन्नईच्या मैदानावर तुफान फटकेबाजीचा नजारा दाखवून दिला. त्याने केलेल्या १३९ धावांच्या खेळीमुळे भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. हेटमायरला शाय होपने नाबाद १०२ धावांची खेळी करत उत्तम साथ दिली. या दोन्ही फलंदाजांमध्ये २१८ धावांची भागीदारी पाहायला मिळाली.  

हेटमायरने आपल्या शतकी खेळीमध्ये ११ चौकार आणि ७ गगनचुंबी षटकार खेचले. हेटमायरने यातील एक षटकार स्टेडियमच्या थेट बाहेर मारला. चेंडूने तब्बल १०२ मीटर अंतर पार केले. उंच आणि लांब पल्ल्याचा हा षटकार पाहून विराटही अवाक् झाल्याचे पाहायला मिळाले. हेटमायरने लगावलेला हा षटकार सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यातील विराटची रिअ‍ॅक्शनही पाहण्याजोगी होती.

INDvsWI : पहिलं अर्धशतक पंतसाठी दिलासा देणार ठरेल

एखाद्या विंडीजच्या फलंदाजांनी भारताविरुद्ध केलेल्या सर्वोत्तम पाच खेळीमध्ये हेटमायरच्या खेळीचा समावेश झाला आहे. सामन्याच्या अगोदर विंडीजचे दिग्गज माजी फलंदाज ब्रायन लारा यांनी विडींजच्या युवा खेळाडूंमध्ये अशक्यप्राय खेळी करण्याची ताकद असल्याचे म्हटले होते. हेटमायरने लारा यांचे बोल खरे करुन दाखवले. 

INDvsWI, 1st ODI : हेटमायर-होप जोडीनं विराट सेनेचं आव्हान सहज परतवलं