पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IND vs WI: विंडीज दौऱ्यावर 'या' नव्या चेहऱ्यांना मिळेल संधी

कोहली-बुमराहला विश्रांती दिली जाण्याची शक्यता

India Tour of West Indies: एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती विंडीज दौऱ्यासाठी काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता आहे. ३ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या विंडीज दौऱ्यासाठी शुक्रवारी (दि.१९) संघ निवड होईल. विश्व चषकानंतर भारतीय संघ अमेरिका आणि विंडीजमध्ये ३ ते १४ ऑगस्टपर्यंत ३ टी-२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळेल. कसोटी मालिका २२ ऑगस्टपासून सुरु होईल. जागतिक कसोटी चॅम्पियनशीपचा हा भाग असेल. 

रोहितकडे वनडे अन् कोहलीकडे कसोटी नेतृत्वाच्या प्रयोगाचे संकेत

कोहली-बुमराहला विश्रांती दिली जाण्याची शक्यता
या दौऱ्यात कर्णधार विराट कोहली, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांच्यासह महेंद्रसिंह धोनी यांनाही विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. कोहली आणि बुमराह कसोटी मालिकेत परतण्याची शक्यता आहे. धोनी आता निवृत्ती घेईल, अशी चर्चा रंगली आहे. परंतु, कोहली आणि बीसीसीआयने याप्रकरणी अजून दुजोरा दिलेला नाही. 

सचिन तेंडुलकरच्या 'वर्ल्ड कपXI'मध्ये धोनी नाही

धोनीबाबत १९ जुलैला निर्णय
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने प्रशासकांबरोबर झालेल्या भेटीनंतर म्हटले की, निवडसमितीची १९ जुलैला मुंबईत बैठक होईल. आम्हाला धोनीकडून काही समजलेले नाही. पण खेळाडू आणि निवडकर्त्यांमध्ये काय चर्चा होईल, या गोष्टी महत्वाच्या आहेत. धोनीने विश्वचषकात चांगली कामगिरी केली होती. याबाबत तोच निर्णय घेऊ शकतो.

मालिकावीर विल्यम्सनलाही सचिनचा रेकॉर्ड ब्रेक करणं जमलं नाही

चागंल्या कामगिरीमुळे या खेळाडुंना मिळू शकते संधी
विंडीज दौऱ्यावर ज्या नवीन चेहऱ्यांना संधी मिळू शकते, त्यामध्ये दीपक चहर, खलील अहमद, नवदीप सैनी आणि आवेश खान यांचा समावेश आहे. चहरने आयपीएलमध्ये यावेळी १७ सामन्यांत २२ विकेट घेतल्या होत्या. तर खलीलनेही १९ विकेट आपल्या खिशात घातल्या होत्या. फिरकीपटूंमध्ये राहुल चहर, मयंक मारकंडे आणि श्रेयस गोपाल हेही भारतीय संघात स्थान मिळवू शकतात. फलंदाजांमध्ये शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनाही संधी मिळू शकते. गिलने आयपीएलमध्ये २९६ धावा जमवल्या होत्या.

टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर; भारत-पाक वेगवेगळ्या गटात

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:india vs west indies selectors likely to give chance of fresh face as pick squad for West Indies tour on July 19