भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पुन्हा एकदा विंडीजच्या फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरला. शनिवारी दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी विंडीजच्या फलंदाजांनी बुमराहच्या गोलंदाजीसमोर गुडघे टेकले. बुमराहने हॅटट्रिकसह ६ विकेट टिपल्या. भारताच्या ४१६ धावांच्या उत्तरादाखल विंडीजने पहिल्या डावात ७ विकेट गमावत अवध्या ८७ धावा केल्या आहेत.
WI vs IND: पहिल्या शतकासह हनुमानं 'नर्व्हस नाईंटी'चा हिशोब केला चुकता!
अँटिग्वा कसोटीत विंडीज विरोधात केवळ ७ धावा देत ५ विकेट घेणाऱ्या बुमराहने किंगस्टनमध्येही आपल्या गोलंदाजीने फलंदाजांना सळो की पळो करुन सोडले. एकापाठोपाठ एक फलंदाजांना त्याने पॅव्हेलियनमध्ये धाडले. पहिल्या कसोटीत बुमराहने ५ विकेट घेतल्या. तर दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात सध्या त्याने ६ विकेट घेतल्या आहेत.
WI vs IND 2nd Test Day 2: पंतचं ये रे.. माझ्या मागल्या गाणं सुरुच
दरम्यान, युवा फलंदाज हनुमा विहारीच्या शानदार शतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ४१६ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या विंडीजच्या फलंदाजांना बुमराहची गोलंदाजी समजलीच नाही. बुमराह शिवाय मोहम्मद शमीनेही एक विकेट घेतली.
WI vs IND : विंडीजच्या 'वजनदार' कॉर्नवॉलच्या नावे अनोखा विक्रम
तत्पूर्वी, इशांत शर्मानेही आपल्या कारकीर्दीतील पहिले अर्धशतक ठोकून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. शर्माने हनुमा विहारीच्या साथीने ११२ धावांची भागीदारी केली. दोघांच्या फलंदाजीमुळे भारताने ४०० चा आकडा पार केला.