पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हिटमॅन रोहितनं कॉट्रेलला षटकार खेचत रचला अनोखा विक्रम

रोहित शर्मा

भारत आणि विंडीज यांच्यात वानखेडेच्या मैदानात सुरु असलेल्या सामन्यात शेल्डन कॉट्रेल घेऊन आलेल्या भारताच्या डावातील तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार खेचत रोहित शर्माने अनोखा विक्रम आपल्या नावे केला. आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने ४०० षटकार खेचण्याचा पराक्रम केला आहे. क्रिकेटच्या तीन प्रकारत मिळून सर्वाधिक षटकार खेचणारा रोहित भारताचा पहिला फलंदाज आहे. क्रिकेट जगतात ४०० चा टप्पा गाठणारा रोहित तिसरा फलंदाज आहे.

पृथ्वीचा डबल धमाका, प्रथम श्रेणीतील पहिले द्विशतक

यापूर्वी पाकिस्तानचा धडाकेबाज फलंदाज शाहिद आफ्रिदीने आणि विंडीजच्या ख्रिस गेलने असा पराक्रम केला आहे. जागतिक क्रिकेटच्या मैदानात सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम हा विंडीजच्या ख्रिस गेलच्या नावे आहे. गेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५३४ षटकार खेचले आहेत. पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीच्या नावे ४७६ षटकारांची नोंद आहे.

ज्वाला गुट्टाचा प्रशिक्षक गोपीचंद यांच्यावर गंभीर आरोप 

बांगलादेशविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत टीम इंडियानं रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली २-१ असा विजय मिळवला होता. या मालिकेत रोहितनं आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट कोहलीला मागे टाकून अव्वल स्थान पटकावलं होते. मात्र विंडीजविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात त्याला नावाला साजेसा खेळ करण्यात अपयश आले होते.
  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: india vs west indies rohit sharma Rohit SIX lofted to Cottrell reach historic milestone