पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रोहितचा हटके अंदाजातील फोटो होतोय व्हायरल!

रोहित शर्मा

विंडीज दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत विंडीजला व्हाइट वॉश केल्यानंतर एकदिवसीय मालिकेतही १-० अशी आघाडी घेतली आहे. भारत-विंडीज यांच्यातील पहिला एकदिवसीय सामन्यावर पावसाने पाणी फेरल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने आपला दबदबा पुन्हा एकदा दाखवून दिला. त्रिनिदादच्या मैदानावर झालेल्या सामन्यात डकवर्थ लुईसच्या नियामानुसार ५९ धावांनी विजय नोंदवत भारताने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत आघाडी घेतली आहे.  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Just been that kind of a day 🌧️🌧️ Pic of the day ☔☔🏏 #TeamIndia #WIvIND

A post shared by Team India (@indiancricketteam) on

अल्प विश्रांतीनंतर विराटच्या भात्यातून अखेर शतक निघाले

विंडीज विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीच्या शतकी खेळीसोबत त्याला अर्धशतकी खेळी करुन अप्रतिम साथ देणाऱ्या श्रेयस अय्यरची सर्वांचे लक्ष वेधले. या दोघांशिवाय सध्या रोहित शर्माचा एक फोटो देखील तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये रोहित शर्मा एका हातामध्ये छत्री आणि दुसऱ्या हातात बॅट घेऊन उभा असल्याचे दिसते. 

शिखर-श्रेयस अय्यरचा VIDEO पाहिल्यास हसू आवरणार नाही

टीम इंडियाच्या इन्टाग्राम अकाउंटवरुन हा फोटो शेअर करण्यात आला आहे. त्याचा हा फोटो सामना सुरु होण्यापूर्वीचा असून यात तो सरावाच्या जर्सीमध्ये असल्याचे दिसते. रोहित शर्माने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ३४ चेंडूत १८ धावांचे योगदान दिले होते.   
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: india vs west indies rohit sharma practice with bat and umbrella in hand photo is going viral