जमैकातील सबीना पार्कच्या मैदानावर सुरु असलेल्या दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटीतील तिसऱ्या दिवशी भारताने विंडीजला अवघ्या ११७ धावांत आटोपले. हुनमा विऱारी (१११), मयंक अग्रवाल (५५), विराट कोहली (७६) आणि ईशांत शर्मा (५७) धावांच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ४१६ धावांचा डोंगर रचला होता.
दुसऱ्या दिवशी भारताचा डाव संपुष्टात आल्यानंतर बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर विंडीजची आघाडी कोलमडली. क्रेग ब्रेथवेट (१०), कॅम्पबेल (२), डी. ब्रावो (४) धावा करुन परतल्यानंतर ब्रुक्स आणि चेसला बुमराहने खातेही उघडू दिले नाही. विंडीजकडून हेटमायरने सर्वाधिक ३४ धावांची खेळी केली याव्यतिरिक्त जेसन होल्डर (१८), कॉर्नवॉल (१४) आणि रोच (१७) या खेळाडूंना दोन आकडी धावसंख्या उभारता आली.
IND vs WI: बुमराहचा भेदक मारा, हॅटट्रिकसह टिपले ६ बळी
जसप्रीत बुमराहच्या ६ विकेट्स आणि मोहम्मद शमी दोन तर ईशांत शर्मा आणि जडेजा यांनी प्रत्येकी एक-एक बळी मिळवत विडींजचा डाव ११७ धावांत आटोपला. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने विंडीजला फॉलोऑन न देता पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात अर्धशतकी खेळी करणारा मयंक अग्रवाल ४ धावांची भर घालून तंबूत परतला. उपहारापर्यंत भारताने १ बाद १६ धावा करत ३१५ धावांची आघाडी घेतली होती.