पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvWI 1st Test : जडेजाचे अर्धशतक, भारताचा पहिला डाव २९७ धावांत आटोपला

रविंद्र जडेजा

आँटिग्वाच्या मैदानात सुरु असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रविंद्र जडेजाच्या संयमी अर्धशतकाच्या जोरावर भारताने २९७ धावांपर्यंत मजल मारली आहे. लोकेश राहुल (४४), अजिंक्य रहाणे (८१), हनुमा विहारी (३२) यांच्या महत्त्वपूर्ण खेळीच्या जोरावर पहिल्या दिवसाखेर भारताने ६ बाद २०३ धावा केल्या होत्या. 

 

INDvWI 1st Test Match :  दुसऱ्या दिवशी भारताची मदार पंत-जडेजा जोडीवर होती  

ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजाने दुसऱ्या दिवशीच्या भारताच्या डावाची सुरुवात केली. पंत फार काळ मैदानात थांबला नाही. रोचनं २४ धावांवर खेळणाऱ्या पंतला होल्डरकरवी झेलबाद केले. जडेजाने सर्व सूत्र आपल्या हाती घेत महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी करत भारताचा डाव सावरला. ईशांत शर्माने १९ धावा करत त्याला उत्तम साथ दिली. होल्डरने ५८ धावांवर खळणाऱ्या जडेजाला बाद करत भारताला २९७ धावांवर रोखले. जसप्रित बुमराह ४ धावांवर नाबाद राहिला. वेस्ट इंडिजकडून केमार रोचने सर्वाधिक ४ बळी मिळवले. गब्रिएलने ३ , रोच चेसने २ आणि होल्डने १ गडी बाद करत त्याला उत्तम साथ दिली.

Ashes 2019 : जो रुटच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: India vs West Indies Live score 1st Test Day 2 in Antigua Windies bowl out India for 297 runs