आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी बीसीसीआय निवडसमितीचे अध्यक्ष एमके प्रसाद यांनी रविवारी भारतीय संघाची घोषणा केली. विश्वचषकातील सेमीफायनलमधील पराभवनानंतर कसोटी आणि मर्यादीत षटकांच्या सामन्यात विभागून नेतृत्वाबाबत विचार मागे पडल्याचे संघ निवडीनंतर दिसून आले. विराट कोहलीकडे तिन्ही प्रकारचे नेतृत्व कायम ठेवण्यात आले असून टी-२० आणि एकदिवसीय संघाच्या उपकर्णधार पदी रोहित शर्मा कायम आहे.
कसोटी संघाच्या उपकर्णधारपदी अजिंक्य रहणेची निवड करण्यात आली आहे. मात्र त्याला एकदिवसीय आणि टी-२० संघात स्थान मिळालेले नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० सामन्यासाठी हार्दिक पांड्याला विश्रांती देण्यात आली असून त्याच्या ऐवजी कृणाल पांड्याला स्थान देण्यात आले आहे. याशिवाय अनेक नव्या चेहऱ्यांना पसंती देण्यात आली आहे. धोनीने या दौऱ्यातून माघार घेतल्यानंतर ऋषभ पंतने तिन्ही प्रकारात स्थान मिळवले आहे. कसोटी संघात वृद्धिमान साहालाही संधी देण्यात आली आहे.
टी-२० :
विराट कोहली (कर्णधार) धवन रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर , मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), कृणाल पांड्या, रविंद्र जडेजा, वाशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार खलिद अहमद, दिपक चहल, नवदीप सैनी
एकदिवसीय संघ
विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद,नवदीप सैनी
कसोटी संघ
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयांक अग्रवाल, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), वृद्धीमान साहा (यष्टिरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव