पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

#INDvWI: कोहलीनं सचिन, लाराचा विक्रम मोडला

विराट कोहली

भारतीय संघाचा कर्णधार आणि क्रिकेट जगतातील रनमशीन विराट कोहलीने वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २० हजार धावांचा टप्पा पार केला. क्रिकेट जगतात सर्वाधिक कमी डावात २० हजार धावा करण्याचा पराक्रम आता विराटच्या नावे झाला आहे. सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा यांनी ४५३ डावात २० हजार धावांचा टप्पा पूर्ण केला होता. दोन्ही दिग्गजांचा विश्वविक्रम कोहलीनं ४१७ व्या डावात मोडीत काढला.  

आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत २० हजार धावांचा पल्ला गाठणारा विराट कोहली तिसरा भारतीय फलंदाज आहे. यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावे ३४ हजार ३५७ धावा आहेत. तर  'मिस्‍टर रिलायबल' राहुल द्रविडच्या नावे २४ हजार २०८ धावा आहेत.

#BANvAFG Controversy Video: तुम्हीच ठरवा हा झेल योग्य होता का?

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २० हजार धावा करणाऱ्या दिग्गजांमधील ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉन्टिंगने ४६४ डाव, दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सने ४८३ आणि जॅक कॅलिसने ४९१ डाव तर राहुल द्रविडने ४९२ डाव खेळले होते. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात रोचने आघाडीच्या फलंदाजांना माघारी धाडल्यानंतर अडचणीत सापडलेल्या भारतीय संघाच्या डावाला आकार देण्याची जबाबदारी कोहलीने आपल्या खांद्यावर घेतली. विक्रम प्रस्थापित केल्यानंतर कोहलीने अर्धशतक झळकावले. त्याने ८२ चेंडूत ७२ धावांची खेळी केली. यात ८ चौकारांचा समावेश आहे. 

ICC WC #INDvWI, Live : हताश कॅरेबियनसमोर 'विराट' चॅलेंज

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:india vs west indies icc world cup 2019 virat kohli scripts history breaks sachin tendulkar and brian laras world record