पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : आदर राखून कोहलीनं पुरा केला हिशोबाचा फेरा

विराट कोहली

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने विंडीज विरुद्धच्या सलामीच्या सामन्यात (तीन सामन्यांच्या मालिकेतील) दमदार खेळीसह भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. आपल्या आक्रमक अंदाजाने ओळखल्या जाणाऱ्या विराटने कॅरेबियन स्टाइलने सेलिब्रेशन करत दोन वर्षांपूर्वीची घटना मी ही नोट करुन ठेवली होती. (लक्षात ठेवली होती) हे दाखवून दिले. हैदराबादच्या मैदानात विराटने काहीतरी लिहितोय असे दाखवत प्रतिस्पर्धी गोलंदाजाने केलेल्या जुन्या गोष्टीला उजाळा दिला.  
South Asian Games: पदतालिकेत भारत टॉपला, आतापर्यंत मिळाली एवढी

हैदराबादच्या मैदानात झालेल्या सामन्यात विंडीजचा जलदगती गोलंदाज केसरिक विलियम्स आणि विराट कोहली यांच्यात खुन्नस पाहायला मिळाली. मैदानातील कृतीबद्दल सामन्यानंतर विराट म्हणाले की, केसरिकने जेमेकाच्या मैदानात मला बाद केल्यानंतर नोटबुक दिले होते. ती गोष्ट माझ्या लक्षात होती. त्यामुळे मी त्याला  नोटबुक दाखवले. सामन्यानंतर आम्ही दोघांनी हस्तांदोलन केले. प्रतिस्पर्ध्याचा सन्मान करायलाच हवा, असे मी मानतो, असेही विराटने सांगितले.  

हा अति क्रिकेटचा परिणाम आहे का? ढिसाळ क्षेत्ररक्षणावर युवी संतापला

विलियम्सने २०१७ मध्ये विराट कोहलीला बाद केल्यानंतर  नोटबुक स्टाइलमध्ये 'गुड बाय' केलं होते. त्यामुळेच या सामन्यात विराट कोहलीने विलियम्सच्या गोलंदाजीवर फटकेबाजी केल्यानंतर कॅरिबियन खेळाडूंप्रमाणे सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. क्रिकेटच्या मैदानात कॅरेबियन प्रिमीयर लीगमध्ये हटके अंदाजात सिलेब्रेशन केल्याचे पाहायला मिळते. विराटने कॅरेबियन खेळाडूची नक्कल करुन दाखवली.    

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:india vs west indies first t20 virat kohli reveals why he immitate west indies fast bowler kesrick williams