पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsWI T20 : जिंकला नाही तरी चालेल पण, 'बलशाली' होऊन परता : लारा

ब्रायन लारा

India vs West Indies: कायरन पोलार्डच्या नेतृत्वाखाली भारत दौऱ्यावर असलेल्या संघाने मायदेशी परतताना शक्तीशाली होऊन परतावे, असे मत  विंडीजच्या माजी दिग्गज क्रिकेटर ब्रायन लारा यांनी व्यक्त केले आहे. भारतामध्ये खेळणे नेहमीच कठिण असते. त्यामुळे संघासमोर आव्हान नक्कीच असेल. त्यामुळे संघाने जिंकायलाच हवे असे मला वाटत नाही. तर भारत दौऱ्यावरुन परतताना एक उत्तम दर्जाचा संघ बनून मायदेशी परतावे, असा सल्ला लारा यांनी विंडीज संघाला दिलाय.  

'त्या' धक्क्यातून मॅक्स'वेल' सावरतोय, लवकरच कमबॅक करण्याचे संकेत

हैदराबादच्या मैदानातून विंडीजचा संघ भारताविरुद्धच्या तीन सामन्यांची टी-२० मालिका आणि तीन सामन्यांच्या एकदिवसीय दौऱ्याला सुरुवात करतोय. भारतीय संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आगामी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवरही टी-२० मालिका महत्त्वपूर्ण मानली जात आहे. भारत-विंडीज यांच्यातील सलामीच्या सामन्यापूर्वी ब्रायन लारा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

फुकाची बडबड करणे हीच त्यांची वृत्ती, इरफानने घेतली रझाकची शाळा

ते म्हणाले की,  पोलार्डने मजबूत संघ बांधणी करायला हवी. पोलार्डने विंडीजसाठी फार सामने खेळलेले नाहीत. पण जगभरातील अनेक लीगमध्ये तो खेळला आहे. प्रतिस्पर्धी त्याचा सन्मान करतात. त्यामुळे विंडीज संघाची धूरा त्याच्याकडे देणे योग्य निर्णय वाटतो. संघातील सहकाऱ्यांसोबतही त्याचे चांगले संबंध आहेत. आगामी टी-२० विश्वचषकासाठी मजबूत संघ बांधणीसाठी पोलार्डचा अनुभव उपयुक्त ठरेल, असा विश्वासही लारा यांनी व्यक्त केला आहे.