पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsWI: होपला तंबूत धाडत शमीनं घातली विक्रमाला गवसणी

मोहम्मद शमी

India vs West Indies, 3rd ODI at Cuttack: भारत आणि वेस्टइंडिज यांच्याती तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यासह टीम इंडियाने मालिका खिशात घातली. कटकच्या मैदानात नाणेफेक जिंकून कर्णधार विराट कोहलीने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. वर्षातील अखेरचा सामना जिंकून भारतीय संघाने वर्षाचा शेवट गोड केलाय. याशिवाय मोहम्मद शमीनेही वर्षातील सर्वोत्तम कामगिरीची नोंद आपल्या नावे केली. 

INDvsWI : हिटमॅन रोहितनं मोडला जयसूर्याचा २२ वर्षांपूर्वीचा विक्रम

विंडीज विरुद्धच्या सामन्यात मोहम्मद शमीने शाय होपला तंबूत धाडत यंदाच्या वर्षात (२०१९) सर्वाधिक बळी मिळवण्याचा विक्रम आपल्या नावे केला. या वर्षातील शेवटच्या सामन्यातील एका विकेटसह मोहम्मद शमीने एकदिवसीयमध्ये सर्वाधिक ४२ बळी टिपले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये यंदाच्या वर्षात सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत न्यूझीलंडचा ट्रेंड बोल्ट दुसऱ्या स्थानावर आहे. मोहम्मद शमीने विंडीजविरुद्धच्या सामन्यात ६६ धावा खर्च करुन १ बळी मिळवला. यापूर्वी २०१४ मध्ये मोहम्मद शमीने ३८ बळी मिळवण्याचा पराक्रम करुन दाखवला होता. यंदाच्या वर्षी त्याने आपल्या कामगिरीत कमालीची सुधारणा करत कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. 

विक्रमादित्य सचिनने दिला 'त्या' वेदनादायी आठवणींना उजाळा

कॅलेंडर इयरमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजामध्ये अव्वलस्थान मिळवणारा मोहम्मद शमी चौथा भारतीय गोंलदाज आहे. यापूर्वी कपिल देव यांनी १९८६ मध्ये (३२ विकेट), अजित आगरकर १९९८ (५८ विकेट), २००४ मध्ये इरफान पठान (४७ विकेट) घेण्याचा पराक्रम केला होता. २०१४ नंतर दुसऱ्यांदा मोहम्मद शमीने सर्वाधिक बळी मिळवण्याचा पराक्रम करुन दाखवलाय. विशेष म्हणजे यंदाच्या वर्षी एकदिवसीय क्रिकेटमध्ये फलंदाजांच्या यादीतही भारताचा दबदबा राहिला. रोहित शर्माने यंदाच्या वर्षी सर्वाधिक धावा केल्या आहेत.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:India vs West Indies 3rd odi Mohammed Shami claims impressive record for 2nd time in his ODI career