भारत आणि विंडीज यांच्यातील तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना बुधवारी पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानात रंगणार आहे. हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरेल. तर दुसरीकडे हा सामना जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवण्यासाठी विडींज प्रयत्नशील असेल.
Ashes 2019 : लॉर्डसवर 'लॉर्ड' खेळीसाठी इंग्लंड संघात मोठा फेरबदल
विंडीज-भारत यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही पावसाने व्यत्यय आणल्याचे पाहायला मिळाले. दुसऱ्या सामन्यात भारताला डकवर्थ लुईस नियमानुसार, ५९ धावांनी विजय घोषित करण्यात आले. त्यानंतर आता तिसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या दरम्यानही पावसाची शक्यता आहे.
श्रेयस अय्यर! टीम इंडियाच्या डोकेदुखीवरील जालीम उपाय
बुधवारी पोर्ट ऑफ स्पेनमध्ये पावसाची शक्यता स्थानिक हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड होऊ शकतो. खेळपट्टीचा विचार केल्यास या मैदानातील हा दुसरा सामना असल्यामुळे फलंदाजांना धावांसाठी झगडावे लागू शकते. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फंलदाजी करण्यास प्राधान्य देईल. तिसऱ्या सामना पावसामुळे रद्द झाला तर भारतीय संघ टी-२० मालिकेनंतर एकदिवसीय मालिकाही खिशात टाकेल. त्यामुळे विंडीजचे खेळाडू आणि चाहते सामना रद्द होऊ नये, अशीच प्रार्थना करतील.