पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

WI vs IND 2nd Test; DAY-1: ऋषभ पंत-हनुमा विहारीने सावरला डाव

हनुमा विहारी आणि ऋषभ पंत

भारताने विंडीज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पहिल्या डावात ५ विकेट गमावत २६४ धावा केल्या आहेत. हनुमा विहारी ४२ आणि ऋषभ पंत २७ धावांवर नाबाद आहे. तत्पूर्वी विंडीजने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. भारताने ३२ धावांवर आपली पहिली विकेट गमावली. के एल राहुलने १३ धावांवर जेसन होल्डरच्या चेंडूवर रहकीम कॉर्नवालला दुसऱ्या स्लिपमध्ये झेल दिला. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या चेतेश्वर पुजारा ६ धावा काढून कॉर्नवालचा बळी ठरला. 

धोनीची निवड का झाली नाही, एमएसके प्रसाद यांनीच सांगितलं कारण

तिसऱ्या विकेटसाठी मयंक अग्रवाल आणि विराट कोहली यांच्यात ६९ धावांची भागीदारी झाली. भारताची धावसंख्या ११५ असताना मयंक अग्रवाल ५५ धावांवर जेसन होल्डरच्या चेंडूवर बाद झाला. कॉर्नवालने दुसऱ्या स्लिपमध्ये त्याचा झेल टिपला. अंजिक्य रहाणेही २४ धावांवर बाद झाला. भारताची धावसंख्या १६४ असताना रहाणेला केमॉर रॉचच्या चेंडूवर हॅमिल्टनने त्याचा झेल घेतला.

अंबाती रायडूचा यू-टर्न, निवृत्तीचा निर्णय मागे

त्यानंतर कर्णधार विराट कोहलीने हनुमा विहारीच्या साथीने भारताची धावसंख्या २०२ पर्यंत पोहोचवली. विराट ७६ धावांवर होल्डरने त्याचा बळी घेतला. त्यानंतर पंत आणि विहारीने दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताला आणकी धक्का बसला नाही. या दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी आतापर्यंत ६२ धावांची नाबाद भागिदारी केली आहे. विंडीजकडून होल्डरने ३, रॉश आणि कॉर्नवालने १-१ विकेट घेतली.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:India vs West Indies 2nd Test Update from Sabina Park Kingston Jamaica India first day game