पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IND vs WI 2nd Test: विंडीज संघ संकटात, भारताची विजयाकडे वाटचाल

विंडीज संघ संकटात, भारताची विजयाकडे वाटचाल

भारतीय संघ दुसऱ्या कसोटीतही विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. भारताने दुसऱ्या डावांत ४ विकेटच्या बदल्यात १६८ धावांवर डाव घोषित करत पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विंडीजला ४६८ धावांचे आव्हान दिले आहे. या आव्हानाला उत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेल्या विंडीज संघाचे फलंदाज पुन्हा एकदा भारतीय वेगवान माऱ्यासमोर असहाय्य दिसले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत विंडीजने ४५ धावांवर दोन विकेट गमावल्या आहेत. शमराह ब्रुक्स नाबाद ४ आणि डॅरेन ब्राव्हो नाबाद १८ धावांवर खेळत आहेत. विजयापासून अजूनही ते ४२३ धावा दूर आहेत. 

WI vs IND 2nd ODI: विंडीजचा पहिला डाव अवघ्या ११७ धावांत आटोपला

दुसऱ्या डावात धावांच्या डोंगरासमोर विंडीज संघ दबावात आला. सलामीवीर क्रेग ब्रेथवेटच्या (३) रुपात पहिला धक्का बसला. त्याला इशांत शर्माने ऋषभ पंतकडे झेल देण्यास भाग पाडले. दुसरा धक्का मोहम्मद शमीने दिला. त्याने जॉन कम्पबेलला (१६) बाद केले. कॅम्पबेलने कर्णधार विराट कोहलीकडे झेल दिला. भारताने विंडीजला पहिल्या डावात ११७ धावांवर गुंडाळले होते. तरीही कोहलीने विंडीजला फॉलोऑन न देण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात ४१६ धावा केलेल्या भारताने पहिल्या डावात २९९ धावांचा आघाडी घेतली होती.

...तर ऑलिम्पिक पात्रता फेरीतील भारत-पाक सामना युरोपात रंगेल

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:india vs west indies 2nd test 3rd day match report ajinkya Rahane and hanuma Vihari put India in driver seat in Jamaica Test