पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : कॅरेबियन पठ्ठ्याचा रोहितच्या खेळीला सलाम

रोहित शर्मा आणि शेल्डर कॉट्रिएल

India vs West Indies, 2nd ODI: विशाखापट्टणमच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या सामन्यात दिमाखदार विजय नोंदवत भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेतील आपले आव्हान कायम राखले. या सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्माने १५९ धावांची दमदार खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. पण हा गौरव होण्यापूर्वी प्रतिस्पर्धकाने त्याच्या खेळीला सलाम केल्याचे चित्र पाहायला मिळाले.  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Just been that kinda innings 🙌🏻🙌🏻 #SpiritOfCricket #TeamIndia #INDvWI @paytm

A post shared by Team India (@indiancricketteam) on

INDvsWI : कुलदीपची हॅटट्रिक! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय गोलंदाज

रोहित शर्माने १५० धावांचा टप्पा पार केल्यानंतर तो पुन्हा एखदा डबल धमाका करणार असे वाटत असताना शेल्डन कॉट्रिेलने त्याच्या खेळीला ब्रेक लावला. रोहितने १३८ चेंडूत १५९ धावांची खेळी केली. शेल्डन कॉट्रिएल विकेट मिळवल्यानंतर 'सावधान..सेल्युट' ही शैली सर्वांनाच परिचित आहे. रोहितला बाद केल्यानंतर त्याने असाच आनंद साजरा केला. पण यावेळी त्याच्या शैलीत एक वेगळेपण पाहायला मिळाले. त्याच हे सेलिब्रेशन रोहितला सलाम करणारे होते, असाच काहीसा प्रकार त्याने केला. कारण विकेटचा आनंद साजरा केल्यानंतर त्याने रोहितला मोठ्या खेळीबद्दल मोठ्या मनाने शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले.  

INDvsWI,2nd ODI: दणदणीत विजयासह टीम इंडियाची मालिकेत बरोबरी

आपल्या सिग्नेचर स्टाइल 'सेल्यूट' ने यावेळी रोहितच्या चाहत्यांचे मनही जिंकले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यावर अनेक संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. खिलाडूवृत्तीच आणखी एक उदाहरण या निमित्ताने क्रिकेट चाहत्यांनी अनुभवले, अशा आशयाच्या प्रतिक्रिया देखील उमटताना दिसत आहेत.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:india vs west indies 2nd odi Rohit Sharma slams 159 runs Windies players salute watch video