पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsWI : वर्षाअखेरपर्यंत रोहित शर्माच टॉपर राहणार की, ...

रोहित शर्मा

विशाखापट्टणमच्या मैदानात विंडीज विरुद्धच्या 'करो वा मरो' लढतीत रोहित शर्माने अनोखा विक्रम आपल्या नावे केला. यंदाच्या वर्षी (२०१९) एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो अव्वलस्थानी पोहचला आहे. भारताच्या डावातील १३ व्या षटकात अल्झारी जोसेफच्या अखेरच्या चेंडूवर एक धाव घेत त्याने कँलेंडर इयरमध्ये १ हजार ३०० धावांचा टप्पा पार केला.   

INDvsWI,2nd ODI Live: दुसऱ्या वनडे सामन्याच्या सर्व अपडेट्स एका क्लिकवर 

यंदाच्या वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. विराटच्या नावे १ हजार २९२ धावा आहेत. १ हजार २२५ धावांसह विंडीजचा शाय होप तिसऱ्या क्रमांकावर १ हजार १४१ धावांसह ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच चौथ्या स्थानावर आहे.   

IPL 2020 Auction: जाणून घ्या लिलावाची वेळ आणि बरचं काही

रोहित शर्माचा कँलेडर इयरमधील कामगिरीवर नजर टाकल्यास यंदाच्या वर्षातील कामगिरी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी २०१७ मध्ये त्याने १ हजार ३०० धावा केल्या होत्या. २०१३ मध्ये १ हजार १९६ आणि मागील वर्षी तो १ हजार ३० धावांपर्यंत पोहचला होता. यंदाच्या वर्षाखेरपर्यंत रोहित शर्माला मागे टाकण्याच्या शर्यतीत केवळ भारतीय कर्णधार विराट कोहली हाच असल्याचे दिसते. या सामन्यातील रोहित शर्माची मोठी खेळी विराटचे लक्ष्य आणखी अवघड करु शकते शिवाय रोहित शर्माकडे  विंडीज विरुद्धचा तिसरा आणि अखेरचा सामनाही असेल. त्यामुळे वर्षाखेरीस एकदिवसीय मध्ये सर्वाधिक धावा करुन टॉपला राहण्याची रोहित शर्माकडे अधिक संधी आहे.