पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsWI : आकडेवारी पाहून तुम्हीच ठरवा दुसऱ्या वनडेत कोण भारी ठरेल?

रोहित शर्मा आणि विराट कोहली

India vs West Indies, 2nd ODI at Visakhapatnam: पाहुण्या वेस्ट इंडिजने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील सलामीच्या सामन्यात भारताला पराभवाचा दणका दिला. या पराभवाची परतफेड करुन मालिकेत बरोबरी साधण्याच्या इराद्याने भारतीय संघ बुधवारी मैदानात उतरेल. विशाखापट्टणमच्या मैदानात होणारा सामना भारतीय संघासाठी 'करो वा मरो' असाच आहे. सामना गमावला तर भारतावर मालिक गमावण्याची नामुष्की ओढावू शकते. 

IPL 2020 Auction: जाणून घ्या लिलावाची वेळ आणि बरचं काही

पहिल्या एकदिवसीय सामन्यातील दिमाखदार कामगिरीनंतर विंडीज संघाचे मनोबल उंचावलेले आहे. त्यांना पोलार्डच्या नेतृत्वाखाली २००६ नंतर भारतात एकदिवसीय मालिका जिंकण्याची संधी आहे. इतिहास रचण्याच्या इराद्यानेच संघ मैदानात उतरेल. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी नजर टाकूया आकड्यांवर....

#२००३ पासून आतापर्यंत तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत पहिल्या दोन सामन्यात पराभव पत्करण्याची वेळ भारतीय संघावर केवळ दोनवेळा आली आहे. २०१२ मध्ये पाकिस्तानी संघाने टीम इंडियाला पराभूत केले होते.  

#एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील भारतीय संघाच्या चार पराभवामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्याचा समावेश आहे. याशिवाय २००५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध २-० अशी आघाडीवर असताना भारताने मालिका २-४ अशी गमावली होती.  

 #विंडीजच्या संघाने मागील चार एकदिवसीय सामन्यात सातत्यपूर्ण विजय मिळवला आहे. लखनऊच्या मैदानात विंडीजने अफगानिस्तानला ३-० अशी मात दिली होती. त्यानंतर त्यांनी भारतीय संघाला पराभवाचा धक्का दिला. अर्थात विंडीजने चारही सामने भारतीय मैदानात जिंकले आहेत.  
 
#विशाखापट्टणमच्या मैदानात आतापर्यंत झालेल्या पाच सामन्यात विराट कोहलीने १३९ च्या सरासरीने ५५६ धावा केल्या आहेत. यात तीन शतके आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. विशाखापट्टणमच्या मैदानात विंडीजविरुद्ध देखील त्याचे रेकॉर्ड चांगले आहे. विंडीजविरुद्धच्या तीन डावात दोनवेळा १५० प्लस आणि एका सामन्यात ९९ धावांची खेळी विराटने केली आहे.  

#विशाखापट्टणमच्या मैदानातील ८ सामन्यातील ६ सामने भारतीय संघाने जिंकले आहेत. विंडीजने या मैदानात भारताविरुद्ध एकमेव सामना २०१३ मध्ये जिंकला होता. 

# आशियाई मैदानावर खेळताना शाय होपने १४६.३३ च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. त्यांच्या ताफ्यात अन्य कोणत्याही खेळाडूनाल ५०० पेक्षा अधिक धावा करता आलेल्या नाहीत. आशियातील १२ सामन्यात होपने ५ शतके आणि २ अर्धशतके झळकावली आहे. 

स्मृतीची आयसीसीच्या ODI अन् T-20 संघात वर्णी