पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsWI: चौथ्या क्रमांकासाठी कोण सक्षम ठरेल?

मनीष पांडे, श्रेयस अय्यर

विश्वचषकाचा प्रबळ दावेदार असताना मध्यफळीतील फलंदाजांच्या अपयशामुळे भारताने विश्वजेता ठरण्याची संधी गमावल्याचे आपण पाहिले आहे.. गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघातील चौथ्या क्रमांकावर अनेक चर्चा रंगत आहेत. विश्वचषकात संघाला पुन्हा या जागेला योग्य फलंदाज नसल्याचा फटका बसला. त्यानंतर आता भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्याला जाणार आहे. विंडीज दौरा भारतासाठी अधिक आव्हानात्मक नसला तरी या दौऱ्यात तरी चौथ्या क्रमांकाचा तिढा सुटणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरले.  

केएल राहुल चांगल्या फॉर्ममध्ये आहे. पण विश्वचषकात धवन दुखापतग्रस्त झाल्यानंतर सलामीची जबाबदारी त्याच्यावर देण्यात आल्याने भारताला चौथ्या क्रमांकाची उणीव पुन्हा जाणवली. विंडीज दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात श्रेयस अय्यर आणि मनीष पांडेला संधी देण्यात आली आहे. चौथ्या क्रमांकाचा पेच सुटण्याच्या दृष्टिने या दोघातील कोण अधिक क्षमता सिद्ध करणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.  

ज्युनिअर टीम इंडियाने विंडीज अ विरुद्धची मालिका जिंकली

मनीष पांडेने २३ वनडे सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले तर दुसरीकडे श्रेयस अय्यर ६ वनडे खेळला आहे. दोन्ही फलंदाजांमध्ये मध्यफळीत चांगली खेळी करण्याची क्षमता आहे. पांडेने भारत अ संघाकडून विंडीज दौऱ्यावर ४ सामन्यात १५५ धावा केल्या आहेत. यात एका शतकाचा समावेश आहे. २०१९ च्या आयपीएलमध्येही त्याने कमालीची कामगिरी केली होती.  

दुसरीकडे श्रेयस अय्यरला भारतीय संघात फारच कमी वेळा संधी मिळाली आहे. वनडे सामन्यातील पदार्पणानंतर आतापर्यंत श्रेयस अय्यरने ६ सामने खेळले आहेत. आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटलकडून खेळणाऱ्या श्रेयस अय्यरने दमदार कामगिरी केली होती. त्याने १६ सामन्यात ४६३ धावा केल्या होत्या.  

धोनीच्या निवृत्तीवर एमएसके प्रसाद यांची रिअ‍ॅक्शन

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: india vs west indies 2019 can shreyas iyer and manish pandey solve india middle order problem