विंडीज आणि भारत यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला आज पासून सुरुवात होत आहे. एटींगाच्या नॉर्थ साउंडच्या विव रिचर्डस मैदानात रंगणार आहे. कसोटी सामन्याच्या सुरुवातीला भारतासमोर रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यातील कोणाला टीम इलेव्हनमध्ये संधी द्यावी, हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने याबाबत आपले मत मांडले आहे.
ICC WTC Point Table:श्रीलंका अव्वल, भारत-विंडीज शुभारंभासाठी सज्ज
रोहित शर्माला कसोटी संघात कायमस्वरुपी आपले स्थान टिकवण्यात अपयश आल्याचे अनेकदा पाहायला मिळाले. दुसरीकडे अजिंक्य रहाणे कसोटी संघातील कायमचा सदस्यत्व आहे. अजिंक्य रहाणे सातत्यपूर्ण कसोटी संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला असला तरी दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सामन्यात नावाला साजेसा खेळ करण्यात त्याला यश आले नव्हते. २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत रोहित शर्माने चार डावात केवळ ७८ धावा केल्या होत्या.
INDvWI 1st Test Match: विराटकडून रोहित शर्माचे तोंडभरुन कौतुक
सध्याच्या परिस्थितीत लोकेश राहुल आणि मयंक अग्रवाल भारताच्या डावाची सुरुवात करतील, हे जवळजवळ पक्के आहे. मध्यफळीत मात्र रोहित की रहाणे असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. सध्याच्या घडीला गांगुलीने मात्र या दोघांनाही संघात स्थान द्यावे असे म्हटले आहे. रोहित शर्माची विश्वचषक स्पर्धेतील कामगिरी पाहता त्याला आघाडीला पाठवावे तर अजिंक्य रहाणेला मध्यफळीत खेळवावे, असा सल्ला गांगुलीने दिला आहे. याशिवाय पहिल्या कसोटीत साहशिवाय पंतला संधी द्यावी, असेही गांगुलीने म्हटले आहे.