वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून (गुरुवार) सुरुवात होत आहे. एंटीगाच्या नॉर्थ साउंड येथील विव रिचर्डस मैदानात भारतीय प्रमाणवेळेनुसार, रात्री ८ वाजल्यापासून या सामन्याला सुरुवात होणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी विराटने केएल राहुल आणि मयंक अग्रवाल भारताच्या डावाला चांगली सुरुवात करुन देतील, असा विश्वास व्यक्त केला.
सोशल मीडियावरही विराट अधिराज्य गाजवतोय
विराट म्हणाला की, सलामीच्या फलंदाजांविषयी बोलायचे तर आम्ही फक्त दोन सलामीवीरांची निवड केली आहे. दोन्ही सलामीवीरांना चार डावात खेळण्याची संधी मिळेल. यावेळी त्याने लोकेश राहुल आणि मयंक अग्रवाल यांच्या कामगिरीचे कौतुक केले. दोघेही लयीत असून याचा संघाला फायदा होईल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला. याशिवाय विराट कोहलीने हनुमा विहारीचेही कौतुक केले.
INDvsWI : पाँटिंग-धोनीचा विक्रम धोक्यात, विराटकडे सुवर्ण संधी
विराट म्हणाला की, ' संघात स्थान मिळवल्यापासून विहारी सातत्यपूर्ण चांगली खेळी करत आहे. पहिल्या सामन्यात गोलंदाजीमध्ये विहारी उपयुक्त ठरु शकतो. दुसरीकडे रोहित शर्माच्या कामगिरीकडेही त्याने लक्ष वेधले. ऑस्ट्रेलियातील कसोटीत दमदार कामगिरी केली होती. रोहितची क्षमता आपण सर्व गेल्या काही वर्षांपासून पाहत आहोत. त्याच्यासारख्या प्रतिभावंत शैलीचा खेळाडू आपण अनेक वर्षांपासून शोधत होता. विंडीज विरुद्ध समतोल संघ निवडला जाईल, असेही त्याने सांगितले.