भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील सलामीचा सामना शुक्रवारी हैदराबादच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघातील हा सामना आगामी टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जातोय. दोन्ही संघ टी-२० तील आपली ताकद दाखवून देण्यासाठी मैदानात उतरतील. विराट कोहली आणि संघ व्यवस्थापनासमोर प्लेइंग इलेव्हनवेळी लोकेश राहुल आणि संजू सॅमसन यांच्यापैकी कोणाला संधी द्यायची हा मोठा प्रश्न असेल.
INDvsWI T20 : धोनीचा खास विक्रम मागे टाकण्याची पंतकडे संधी
सलामीवीर शिखर धवनच्या दुखापतीनंतर संजू सॅमसनला टी-२० संघात स्थान मिळाले. मात्र प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला संधी मिळणे सहज सोपे नाही. लोकेश राहुलसोबत त्याची खरी स्पर्धा असेल. वेस्ट इंडिजच्या ताफ्यात ब्रँडन किंग याला संधी मिळू शकते. भारतामध्ये अफगाणिस्तान विरुद्धच्या टी-२० मालिकेत विंडीजला १-२ असा पराभव स्वीकारावा लागला होता. एवढेच नाही भारताने विंडीजमध्ये जाऊन त्यांना ३-० अशी धूळ चारली होती. त्यामुळे विंडीजसाठी ही लढाई संघर्षमय अशीच असणार आहे.
INDvsWI T20 : पंतला संधी मिळणार का? विराटनं दिलं सॉलि़ड उत्तर
भारत आणि विंडीज यांच्यातील आतापर्यंतच्या टी-२० सामन्याचा विचार केल्यास भारतीय संघ विंडीजपेक्षा भारी ठरला आहे. भारताकडे ८-५ अशी आघाडी आहे. भारतीय संघाला मायदेशात विंडीजविरुद्ध केवळ एकदा पराभूत व्हावे लागले होते. २०१६ च्या विश्वचषकातील उपांत्य सामन्यात विंडीजने भारताला पराभूत केले होते.
भारताचा संभाव्य संघ :
केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल.
विंडीजचा संभाव्य संघ :
लेंड्ले सिमंस, एविन लुइस, ब्रँडन किंग, शिमरोन हेटमेयर, कीरन पोलार्ड (कर्णधार), दिनेश रामदीन, फॅबियन एलेन, जेसन होल्डर, कीमो पॉल, शेल्डन कोट्रेल, केसरिक विलियम्स.