पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ख्रिस गेलला मैदानावरच डान्स शिकवतानाचा विराटचा व्हिडिओ व्हायरल

विराट मैदानावर डान्स शिकवताना

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना गुरुवारी पावसामुळे रद्द करण्यात आला. पावसामुळे सामन्यात केवळ १३ षटके टाकण्यात आली. पण ३४-३४ षटकांचा करण्यात आलेला सामना पूर्ण होऊ शकलाच नाही. हा सामना एका वेगळ्या कारणामुळे सोशल मीडियात चर्चेत आला आहे. या सामन्यातील भारताचा कर्णधार विराट कोहली आणि वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू ख्रिस गेल यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. 

या व्हिडिओमध्ये विराट कोहली मैदानावर डान्स करून क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसतो. ख्रिस गेल जेव्हा मैदानावर फलंदाजी करीत होता. त्यावेळी विराट कोहली त्यालाही डान्सच्या चाली शिकवताना बघायला मिळतो. या डान्सचा व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मोठ्या प्रमाणात शेअर केला जातो आहे. 

गुरुवारच्या सामन्यात विराट कोहलीने नाणेफेक जिंकल्यावर वेस्ट इंडिजच्या संघाला पहिल्यांदा फलंदाजी करायला बोलावले होते. १३ षटकांमध्ये वेस्ट इंडिजच्या संघाने ५४ धावा केल्या.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:india vs west indies 1st odi virat kohli shows off several dance moves in guyana even manages to rope in chris gayle watch here