पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'फिट है बॉस'!, विराटने शेअर केला २०१६ आणि २०१९ चा व्हिडिओ

विराट कोहली

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आपल्या तंदुरुस्तीवर विशेष लक्ष देतो, हे सर्वांना माहीतच आहे. २०१४ नंतर त्याने आपल्या फिटनेसवर भरपूर मेहनत घेतली आहे. जगातील फिट खेळाडुंच्या यादीत त्याने स्थान मिळवलेले आहे. जगाच्या पाठीवर कुठेही असो फिटनेसबाबत तो गंभीर असतो. भारताचा आज विंडीज विरोधातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना होत आहे. तत्पूर्वी विराटने एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. विराटने २०१६ आणि २०१९ चे दोन व्हिडिओ शेअर केला आहे. 

T20 मध्ये विराट कोहलीने केली रोहित शर्माच्या विश्वविक्रमाची बरोबरी

या दोन्ही व्हिडिओमध्ये विराट वेटलिफ्टिंग करताना दिसतोय. दोन्ही व्हिडिओत खूप फरक आहे. २०१६ च्या व्हिडिओत वेटलिफ्टिंग करताना विराटला मोठी कसरत करावी लागल्याचे व्हिडिओत दिसते. तर २०१९ च्या व्हिडिओत तो सहजपणे वजन उचलताना दिसतोय. या व्हिडिओबरोबर विराटने म्हटले की, एकसारखा व्यायाम तीन वर्षे केल्यानंतर, सलग व्यायाम आणि तंत्रावर लक्ष केंद्रित केल्यामुळे माझ्या शरीराची ताकद वाढली आहे. त्यामुळे मी नेहमीच नवीन शिकण्याचा प्रयत्न करतो. 

मला काही सिद्ध करायची गरज नाहीः विराट कोहली

तीन सामन्यांच्या टी २० मालिकेत भारताने विंडीजला व्हाइट व्हॉश दिला होता. आता वनडे मालिकेतही असाच खेळ करण्याचा विराटचा प्रयत्न आहे. विराटने शेवटच्या टी २० सामन्यात अर्धशतक ठोकले होते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:india vs west indies 1st odi virat kohli shared 2016 and 2019 videos of same exercise videos are going viral ahead of 1st odi ind vs wi