पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Ind Vs SL T20 : गुवाहाटीमध्ये दाखल होताच बुमराह मैदानात, पाहा व्हिडिओ

जसप्रीत बुमराह

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील सलामीच्या सामन्यासाठी दोन्ही संघ गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. रविवारी ५ जानेवारी रोजी बारसपारा क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघातील खेळाडू  गटागटाने गुवाहाटीमध्ये दाखल झाले. दरम्यान काही खेळाडूंनी गुवाहाटीमध्ये दाखल होताच सरावाला प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळाले. 

प्रतिस्पर्धी ताफ्याला निकामी करण्यासाठी आफ्रिकेची 'स्टेनगन' सज्ज

दुखापतीमुळे काही दिवसांपासून क्रिकेटपासून दूर असलेला बुमराह श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून पुन्हा मैदानात उतरण्यास सज्ज झालाय. गुवाहाटीमध्ये दाखल होताच सरावाला प्राधान्य देत त्याने पहिल्या सामन्यासाठी उत्सुक असल्याचे दाखवून दिले. भारतीय क्रिकेट मंडळाने अधिकृत अकाउंटवरुन बुमराहचा सराव करतावेळीचा व्हिडिओ शेअर केलाय. बुमराह भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांच्यासोबत सराव करताना दिसतो. बुमराह सप्टेंबरापासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. दुखापतीनंतर तो दमदार पुनरागमन करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

Cricket Record Book : पदार्पणात षटकाराने खाते उघडणारे चार धाकड गडी!

या मालिकेपूर्वी बुमराह रणजी सामन्यात खेळणार असल्याची चर्चाही रंगली होती. मात्र बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि कर्णधार विराट कोहली यांनी एकमताने त्याला थेट श्रीलंकेविरुद्ध मैदानात उतरण्याची मुभा दिली होती. श्रीलंकेसह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठीही बुमराहला संधी देण्यात आली आहे. ज्यावेळी बुमराहला संघात स्थान देण्यात आले त्यावेळी देखील बीसीसीआयने बुमराहचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या खेळाडूला पाहण्यासाठी किती चाहते आतूर आहेत? असा प्रश्नही बीसीसीआयने क्रिकेट चाहत्यांना विचारला होता.   

भारत विरुद्ध  श्रीलंका टी२० वेळापत्रक
पहिला टी२० सामना ५ जानेवरी, गुवाहाटी, सायंकाळी ७ वाजता 
दुसरा टी२० सामना ७ जानेवारी, इंदोर, सायंकाळी ७ वाजता 
तिसरा टी२० सामना १० जानेवारी, पुणे, सायंकाळी ७ वाजता 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:india vs Sri Lanka T20 Series Jasprit Bumrah back on cricket field on barsapara stadium guwahati bcci tv shared his practice session video watch here ind vs sl t20 full schedule