पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारत विरुद्ध श्रीलंका : स्टेडियममध्ये बॅनर, पोस्टर नेण्यास प्रतिबंध

(छाया सौजन्य : रॉयटर्स)

गुवाहाटीमधील बरसापारा स्टेडियममध्ये रविवारी होणाऱ्या भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात क्रिकेटप्रेमींना बॅनर, पोस्टर आणि स्टोअर कार्ड, मार्कर नेण्यात प्रतिबंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारत विरुद्ध श्रीलंका टी २० सामना श्रृखंलेतील पहिला सामना हा रविवारी होणार आहे. जवळपास ३९ हजारांहून अधिक प्रेक्षकांची क्षमता असलेल्या  बरसापारा स्टेडियममध्ये कोणत्याही प्रकारचे फलक, मार्कर इत्यादी सामान नेण्यास बंदी घालण्यात आली असल्याची माहिती आसाम क्रिकेट असोशिएशनचे सचिव देवाजीज सैकिया यांनी दिली  आहे.

 Ind Vs SL T20 : गुवाहाटीमध्ये दाखल होताच बुमराह मैदानात, पाहा व्हिडिओ

पाकिट, पर्स,  मोबाईल फोन आणि गाडीच्या किल्ला इतकंच सामान स्टेडिअममध्ये नेण्याची परवानगी क्रिकेटप्रेमींना देण्यात आली आहे. स्टेडिअममध्ये बॅनरबाजीस सुरक्षेच्या कारणानं मज्जाव केला आहे, याचा  सुधारित नागरिकत्त्व कायद्याशी कोणताही संबंध नसल्याचं सैकिया यांनी स्पष्ट केलं आहे. आसाममध्ये गेल्या काही दिवसांपासून सुधारित नागरिकत्त्व कायद्याविरोधात आंदोलनं सुरु होती. 

Ind Vs SL T20 : रोहितच्या एक पाऊल पुढे जाण्याची विराटला संधी

केवळ आसामच्या लोकांनाच नाही तर प्रत्येकाला काळजी वाटते. हा मोठा सामना आहे, त्यामुळे सुरक्षेची काळजी घेणं  तितकंच आवश्यक आहे, असंही सैकिया म्हणाले. खेळाडू तसेच क्रिकेटप्रेमींच्या सुरक्षेसाठी इथे मोठा पोलिस ताफाही तैनात करण्यात येणार आहे. या स्टेडिअमची क्षमता ३९ हजार ४०० आहे. जवळपास २७ हजार तिकिटे विकली गेली आहेत, अशी माहिती बीसीसीआयेच ममोन मजुमदार यांनी दिली आहे.