पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC WT20 WC: शेफालीचं पहिले अर्धशतक हुकलं; तरीही भारताचा विजयी चौकार

भारतीय महिलांनी साजरा केला विजय

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या महिला टी-२० विश्वचषकातील अखेरच्या साखळी सामन्यात श्रीलंकन महिलांना पराभूत करत भारतीय महिलांनी विजयी चौकारासह गुणतालिकेतील आपलं अव्वल स्थान कायम राखलं. श्रीलंकन महिलांनी भारतीय महिलांसमोर ११४ धावांचे आव्हान ठेवले होते.

या धावांचा पाठलाग करण्यासाठी शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी भारताच्या डावाला चांगली सुरूवात करून दिली. दोघी चांगला खेळ करत असताना स्मृतीच्या रूपात भारताला पहिला धक्का बसला. १७ धावा करून ती माघारी फिरली. तिची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या हरमनप्रित कौरने १५ धावा केल्या. दुसऱ्या बाजूला शेफालीनं आपल्या कागिरीतील सातत्य कायम असल्याचे दाखवून दिले. टी-२० विश्वचषकातील पहिल्या वहिल्या अर्धशतकाजवळ येऊन ती ४७ धावांवर धाव बाद झाली. दीप्ती आणि रॉड्रीग्ज यांनी प्रत्येकी नाबाद १५ धावांची खेळी करत भारताच्या स्पर्धेतील चौथ्या विजयावर शिक्कामोर्तब केला

टीम इंडियाला धक्का: दुखापतीमुळे इशांत शर्मा संघातून बाहेर

 श्रीलंकन महिलांनी भारतीय महिलांसमोर ११४ धावांचे आव्हान ठेवले होते. प्रथम फलंदाजीस उतरलेल्या श्रीलंकन महिला संघाची सुरूवात खराब झाली. दीप्ती शर्माने लंकेला पहिला धक्का दिला. तिने सलामी फलंदाज उमेशा थिमाशीनीला अवघ्या २ धावांवर माघारी धाडले. राजश्री गायकवाडने मडवीला १२ धावांवर बाद करत लंकेला दुसरा झटका दिला. एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न करणाऱ्या श्रीलंकेच्या कर्णधार अट्टापट्टू हिला राधा यादवने ३३ धावांवर बाद करत श्रीलंकन महिलांची डोकेदुखी आणखी वाढवली. 

कोरोनामुळे या नेमबाजांसमोर भारतातील 'वर्ल्ड कप'ला मुकण्याची चिंता

एस सिरवरदेने १३ आणि कविशा दिल्हारीने अखेरच्या षटकात केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर श्रीलंकन महिलांना निर्धारित २० षटकात ९ बाद ११३ धावांपर्यंत मजल मारता आली. दिल्हारीनं १६ चेंडूत २ चौकाराच्या मदतीने २५ धावांचे योगदान दिले.