पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsSA : वाघ आला पळा पळा...! विराटच्या फोटोवर भन्नाट रिअ‍ॅक्शन

विराट कोहली

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली रांची कसोटीतील पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. मात्र मैदानातील आपल्या हटके अंदाजाने सोशल मीडियावर सध्या तो चांगलाच चर्चेत आहे. भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) विराट कोहलीची फिल्डवरील रिअ‍ॅक्शनचा एक फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. क्रिकेट चाहत्यांनी या फोटोला कॅप्शन सूचवावे, असे बीसीसीआयने म्हटले आहे. 

INDvsSA Day 3 : फॉलोऑनसह भारत रांचीत दिवाळीपूर्वी फटाके फोडणार

या ट्विटर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. नेटकरी कोहलीच्या फोटोचा संबंध बॉलिवूडशी जोडत प्रतिक्रिया देत आहेत. ऑस्करच्या शर्यतीत असलेल्या 'गल्ली बॉय'मधील रॅप साँगचा दाखला देत काहींनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. 'भाग भाग... आया शेर... आया शेर (वाघ आला पळा पळा) ही प्रतिक्रिया लक्षवेधी ठरत आहे. एका चाहत्याने कोहलीची रिअ‍ॅक्शन 'बॉम्बे वेलवेट' चित्रपट पाहून आल्यासारखी आहे, असेही म्हटले आहे. 

6-6-0-1-6-0-6-0-6-W उमेश यादवचा अनोखा विक्रम!

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून विराट कोहलीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र पहिल्या डावात त्याला अवघ्या १२ धावांवर तंबूत परतावे लागले. रोहित शर्मा (२१२) आणि अंजिक्य रहाणे (११५) या मुंबईकर जोडगोळीच्या खेळीच्या जोरावर भारताने आफ्रिकेसमोर ४९७ धावांचे लक्ष्य ठेवले. आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या १६२ धावात कोलमडला असून विराटने आफ्रिकेला फॉलोऑन दिला आहे. भारतीय संघ आफ्रिकेला क्लीन स्वीप देण्याच्या तयारीत आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: india vs south africa virat kohli turns tiger on field twitter says bhaag bhaag aaya sher