पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC WTC : गुणपद्धती विषयी विराटच्या मनात 'खदखद'

विराट कोहली

ICC World Test Championship मध्ये भारतीय संघाने १६० गुणांसह अव्वलस्थान मिळवले आहे. मात्र यातील गुणपद्धतीमध्ये काही त्रूटी असल्याचे मत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना महाराष्ट्र असोसिएशनच्या पुण्यातील गहुंजे मैदानावर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत कोहलीने आपली भूमिका मांडली. 

Pune Test : जाळीतील सरावात विराट सापडला जडेजाच्या जाळ्यात

कोहली म्हणाला की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पाहुण्या संघाला विजयानंतर दुप्पट गुण मिळायला हवेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमुळे कसोटीचा स्तर उंचावला असल्याचेही कोहली यावेळी म्हणाला.  कोणत्याही मालिकेत प्रतिस्पर्धी संघाला क्लीनस्वीप दिल्यानंतर १२० गुण दिले जातात. दोन सामन्यांची मालिका, तीन सामन्यांची मालिका, चार सामन्यांची मालिका आणि पाच सामन्यांच्या मालिकेसाठी गुणपद्धती ही वेगवेगळी आहे. 

INDvSA: दुसरी कसोटी पुण्यात, पण पाण्यात तर नाही ना जाणार?

यावर विराट म्हणाला की, जर मला गुण द्यायचे झाले तर कोणत्याही संघाने परदेशात मिळवलेल्या विजयाला मी दुप्पट गुण दिले असते. पहिल्या हंगामानंतर यात बदल अपेक्षित आहे, अशी भावनाही त्याने व्यक्त केली. यापूर्वी तीन सामन्यांच्या मालिकेत संघ सामना बरोबरीत सोडवण्यावर भर द्यायचे. मात्र चॅम्पियनशिपमुळे सामना जिंकून अधिक गुण खात्यात जमा करण्यासाठी संघ प्रयत्न करताना पाहायला मिळते. हा कसोटीसाठी चांगला संकेत आहे, असे विराट म्हणाला.  

ICC WTC Point Table : आफ्रिकेचा भोपळा, भारत टॉपला

भारतीय संघाने विंडीजला क्लीनस्वीप दिल्यानंतर भारताच्या खात्यात १२० गुण जमा झाले होते. विशाखापट्टणममधील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताने २०३ धावांनी विजय नोंदवत ४० गुणांसह आपल्या खात्यात १६० गुणांची कमाई केली आहे.