पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvSA: विजयानंतर धोनीनं घेतली टीमची भेट, बीसीसीआयनं म्हटलं..

विजयानंतर धोनीने घेतली टीमची भेट

भारताने शानदार अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करत मंगळवारी दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या आणि अंतिम कसोटीत एक डाव आणि २०२ धावांनी पराभूत करुन व्हाइटव्हॉश केला. भारताने सोमवारी तिसऱ्या दिवशी द. आफ्रिकेला फॉलोऑन घेण्यास भाग पाडले आणि दुसऱ्या डावात दिवसअखेर ८ विकेट घेत १३२ धावांवर रोखले होते. यजमान संघाने आज (मंगळवार) केवळ दोन षटकांत विजयाची औपचारिक पार करत द. आफ्रिकेला ४८ षटकांत १३३ धावांवरच गुंडाळले.

भारतीय संघाने रचला इतिहास; द. अफ्रिकेचा २०२ धावांनी पराभव

भारताने पहिल्या डावात ९ विकेटच्या बदल्यात ४९७ धावांवर डाव घोषित केला होता. त्या प्रत्युत्तर देताना द. आफ्रिकेचा पहिला डाव केवळ १६२ धावांत संपुष्टात आला होता. सामना संपल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने पत्रकार परिषद घेतली. यावेळी कोहलीने महेंद्रसिंह धोनी खेळाडूंना भेटण्यासाठी ड्रेसिंग रुममध्ये आल्याचे सांगितले. रांचीमध्ये असूनही धोनी सामना पाहण्यासाठी स्टेडिअमवर आला नव्हता. पण अखेरच्या दिवशी तो खेळाडूंना भेटण्यासाठी तो आला.

INDvsSA : वाघ आला पळा पळा...! विराटच्या फोटोवर भन्नाट रिअ‍ॅक्शन

याची माहिती बीसीसीआयने ट्विट करुन ही माहिती दिली. त्याने ड्रेसिंग रुममध्ये सर्व खेळाडूंची भेट घेतली. त्याने झारखंडचा क्रिकेटपटू शाबाज नदीमशी विशेष चर्चा केली. त्याला चांगल्या खेळीसाठी शुभेच्छा दिल्या. तो काही काळ तिथे थांबला. झारखंड क्रिकेट असोसिएशनने धोनीसाठी खास एक्रेडिटेशन कार्ड केले होते.

'या प्लेइंग इलेव्हनमध्ये विराट सेनेला रोखण्याचा दम'

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:india vs south Africa third test ms dhoni visit ranchi stadium to meet teammates shahbaz nadeem and others