पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsSA : फाटक्या नशीबाच्या कर्णधाराला टॉसची चिंता

फाफ ड्युप्लेसिस आणि विराट कोहली

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना रांचीच्या मैदानात रंगणार आहे. कर्णधार फाफ ड्यु प्लेसिसच्या नेतृत्वाखाली आफ्रिकेने कसोटी मालिका यापूर्वीच गमावली आहे. अखेरचा सामना जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये खाते उघडण्याचे मोठे आव्हान पाहुण्या  आफ्रिकेच्या संघासमोर असेल.  

IndvsSA 3rd Test : वर्दी वाल्यांसाठी ५००० मोफत तिकीटांची तरतूद

आफ्रिकेच्या पराभवाशिवाय कर्णधार फाफ ड्यु प्लेसिसला नाणेफेकीतील अनलकी फॅक्टरचीही चिंता सतावत आहे. आशियातील मागील नऊ सामन्यात त्याला एकदाही नाणेफेक जिंकता आलेली नाही. सातत्यपूर्ण दहाव्यांदा नाणेफेकीत अपयशी ठरु नये, यासाठी तो अनोखी शक्कल लढवणार असल्याचे वृत्त क्रिकबझने दिले आहे. तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात स्वत: विराटसोबत नाणेफेकीला येण्याएवजी तो अन्य कोणाला तरी नाणेफेकीसाठी पाठवू शकतो.  

RCB च्या स्टाफमध्ये महिला मसाज थेरेपिस्टचा समावेश

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात काही दिवसांपूर्वी नाणेफेकीसाठी तीन कर्णधार आल्याचे पाहायला मिळाले होते. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका महिला टी-२० सामन्यात असा प्रकार घडला होता. ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लेनिंगही फाफ ड्युप्लेसीप्रमाणेच नाणेफेकीमध्ये स्वत:ला अनलकी समजत होती. त्यामुळे ती श्रीलंकन महिला संघाची कर्णधार चमारी अट्टापटूसोबत नाणेफेक करताना आपली सहकारी एलिसा हिली हिच्यासोबत मैदानात आली होती. विशेष म्हणजे एलिसाने नाणेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने सामनाही जिंकला होता. तिसऱ्या कसोटीमध्ये या क्षणाची पुनरावृत्ती पाहायला मिळणार का? पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

मेरी कोमशी लढू द्या! भारतीय महिला बॉक्सरचे क्रीडा मंत्र्यांना पत्र

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत विराटच्या नेतृत्वाखाली भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे. पुण्याच्या मैदानातील दुसरा कसोटी सामना मोठ्या फरकाने जिंकत भारताने घरच्या मैदानात सलग ११ कसोटी सामने जिंकण्याचा विश्वविक्रम आपल्या नावे केला होता. तिसरा आणि अखेरचा सामना जिंकून भारतीय संघ आफ्रिकेला क्लिन स्वीप देण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: India vs South Africa third test at ranchi After 9 toss losses in Asia Faf du Plessis might send someone else for a change of luck virat kohli rohit sharma