पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsSA Test: विराटचा 'लाडला' बाहेर! रोहित शर्मा संघात

भारतीय संघ

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये अडखळत खेळणाऱ्या केएल राहुल याला डच्चू देण्यात आला विंडिज दौऱ्यावर बाकावर बसवलेल्या रोहित शर्माला संघात स्थान मिळाले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रोहित शर्मा भारताच्या डावाची सुरुवात करु शकतो. 

DDCA च्या कार्यक्रमात विराट-अनुष्काने घेतली जेटलींच्या पत्नीची सांत्वन भेट

स्थानिक क्रिकेटमध्ये लक्षवेधी खेळी करणाऱ्या शुभमन गिलला देखील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी संघात स्थान मिळाले आहे. त्याला टीम इलेव्हनमध्ये स्थान मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. विंडीज विरुद्धच्या कसोटीमध्ये रोहित शर्माला संघात स्थान मिळाले नव्हते. विश्वचषकात दमदार कामगिरी करुनही रोहित शर्माला बाहेर बसवल्यामुळे क्रिकेट जगतातील अनेकांना धक्का बसला होता. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर निवड समितीने अखेर  रोहित शर्माला पंसती दिली. 

धोनीच्या निवृत्तीची बातमी निराधार- निवड समिती प्रमुख एम.एस.के.प्रसाद

तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेनंतर २ ऑक्टोंबरापासून विशाखापट्टणमच्या मैदानातून भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. १० ऑक्टोबरपासून दुसरा सामना पुण्यात, तर १९ ऑक्टोबरला तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना रांचीच्या मैदानात खेळवण्यात येईल. 

भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत, वृद्धीमान साहा, रविचंद्रन आश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि शुभमन गिल.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: india vs south africa test squad selection rohit sharma kl rahul face off for opening slot