दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने दिमाखदार विजय संपादित करत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यादरम्यान आफ्रिकेच्या खेळाडूंप्रमाणे सुरक्षेसाठी तैनात कर्मचाऱ्यांनाही चांगलीच कसरत करावी लागली.
कोहलीच्या 'विराट' विक्रमानंतर आफ्रिदीने दिली प्रतिक्रिया
सामना सुरु असताना एक क्रिकेट चाहता सुरक्षाकडे तोडून मैदानात आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी सुरक्षा रक्षकांना त्याच्या मागे धावण्याची कसरत करावी लागली. विराट कोहली खेळत असताना आणखी दुसऱ्यांदा असाच प्रकार पाहायला मिळाला. एक चाहता कोहलीसोबत हस्तांदोलन करण्याच्या उद्देशाने मैदानात घुसला होता. सुरक्षा रक्षकांनी त्याला बाहेर काढले. त्यामुळे काहीवेळ खेळात व्यत्यय निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
IND vs SA T20 : भारताचा आफ्रिकेवर एकतर्फी विजय
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्याच्या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना बंगळुरुच्या मैदानात होणार आहे. या सामन्यात पुन्हा अशी पुनरावृत्ती होऊ नये, यासंदर्भात आयोजक निश्चितच लक्ष देतील.