पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IND vs SA : किंग कोहलीची रिकी पॉटिंगच्या विक्रमाशी बरोबरी

विराट कोहली

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कसोटी कारकिर्दीतील २६ शतक पूर्ण केले. त्याच्या दमदार खेळीच्या जोरावर भारतीय संघ दुसऱ्या दिवशीही मजबूत स्थितीत आहे. कोहलीने ८१ व्या कसोटी सामन्यातील १३८ व्या डावात २६ कसोटी शतक झळकावले आहे.  

IND vs SA 2nd test Day 2: दुसऱ्या दिवसांतील सर्व अपडेट्स 

या शतकासह कोहलीने दिग्गज ऑस्ट्रेलियन क्रिकेटर रिकी पाँटींगच्या विक्रमाशी बरोबरी केली. संघाचे नेतृत्व करताना सर्वाधिक शतक झळकवणाऱ्या कर्णधारांच्या यादीत विराट दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅहम स्मिथ अव्वलस्थानी आहे. ग्रॅहम स्मिथच्या नावे २५ शतकांची नोंद आहे.  

जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप : मेरी कोमची पदक निश्चिती! सुवर्ण पंचची आस

विराट कोहलीने दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशीच्या खेळात संयमी सुरुवात केली. त्यानंतर काही आक्रमक स्ट्रोक्स खेळत त्याने धावगती वाढवली. ९१ चेंडूत ८ चौकाराच्या मदतीने अर्धशतक साजरे करणाऱ्या कोहलीन १७३ चेंडूत आपले शतक पूर्ण केले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:india vs south africa second test virat kohli equals big record of legendary ricky ponting