भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील रोहितच्या दमदार खेळीची मालिका सुरुच आहे. सलामीवीराने अखेरच्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात रोहितने २१२ धावा केल्या. कसोटी क्रिकेटमधील रोहित शर्माचे हे पहिले द्विशतक आहे. यापूर्वी त्याने एकदिवसीय क्रिकेट सामन्यात विक्रमी तीनवेळा द्विशतक झळकवण्याचा पराक्रम केला आहे.
INDvsSA Day 2 Stumps : आफ्रिका २ बाद ९ धावा, दुसरा दिवसही भारताचाच!
दुसऱ्या दिवशी ११७ धावांवरुन रोहितने खेळाला सुरुवात केली. द्विशतक साजरे करत त्याने आपल्या खात्यात आणखी काही विक्रमांची नोंद केली. पहिल्या डावात रोहितने २५५ चेंडूत २१२ धावांची खेळी केली. यात २८ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश आहे.
#सलामीवीर म्हणून एका मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोनवेळा १५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याचा पराक्रम त्याने आपल्या नावे केला. असा पराक्रम करणारा रोहित आठवा फलंदाज आहे. यापूर्वी २०१२-१३ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या मायकल क्लार्कने अशी कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले होते.
# कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकवणारा रोहित शर्मा चौथा फलंदाज आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग आणि ख्रिस गेल यांनी अशी कामगिरी केली आहे.
# जानेवारी २०१३ नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात १५० पेक्षा अधिक धावा करण्याच्या शर्यतीत रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने बारा वेळा अशी कामगिरी केली असून या यादीत विराट कोहली आघाडीवर आहे. कोहलीने १३ वेळा १५० पेक्षा अधिक धावा करण्याचा पराक्रम केला आहे.
रोहितच्या विक्रमाचा धडाका सुुरुच, आता थेट सनी पाजींच्या पंक्तीत