पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रोहितचा सराव 'शून्य' खेळ, लक्ष्मण यांचा 'व्हेरीव्हेरी स्पेशल' सल्ला

रोहित शर्मा

आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आणि बोर्ड प्रेसिडेंट इलेव्हन यांच्यातील तीन दिवसीय सराव सामना बरोबरीत सुटला. आफ्रिकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत रोहित शर्मा भारताच्या डावाला सुरुवात करेल असे बोलले जात आहे. त्यामुळे या सराव सामन्यात त्याच्याकडून दमदार खेळीची अपेक्षा होती. मात्र रोहित शर्माला या सामन्यात खातेही उघडता आले नाही. सराव सामन्यात त्याने मयंक अग्रवालसोबत भारताच्या डावाला सुरुवात केली. मात्र दोन चेंडू खेळून फिलेंडरच्या गोलंदाजीवर तो झेल बाद झाला.   

अखेरच्या ४८ सेकंदात भारतीय महिलांनी ग्रेट ब्रिटनला नमवले

त्याच्या या खेळीनंतर भारताचे माजी कसोटीपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी रोहितला नैसर्गिक खेळ करण्याचा सल्ला दिला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत रोहित शर्मा पहिल्यांदा भारताच्या डावाची सुरुवात करणार आहे. यादरम्यान त्याने आपल्या फलंदाजीच्या शैलीत बदल करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या पदरी निराशा येईल, अशी चिंता लक्ष्मण यांनी व्यक्त केली आहे.

धोनीला मर्जीनुसार खेळता येणार नाही : गंभीर

लक्ष्मण म्हणाले की, मी केवळ चार कसोटी सामने खेळल्यानंतर सलामीवीराची भूमिका बजावली होती. रोहितकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा १२ वर्षांचा तगडा अनुभव आहे. परिपक्वता आणि अनुभवाचा त्याला फायदा होईल. मी माझ्या फलंदाजी शैलीत बदल करण्याचा प्रयत्न केला होता. यात मला अपयश आले. त्यामुळे रोहित शर्माने माझ्याप्रमाणे चूक करु नये, असे लक्ष्मण यांनी म्हटले आहे. नैसर्गिक खेळात बदल केला तर हाती काहीच लागत नाही, असा उल्लेखही लक्ष्मण यांनी केला.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:India vs South Africa Rohit Sharma Scoring A Duck In Practice Game vvs laxman advice him