पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फिरकीपटू अश्विन विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर

आर. अश्विन

जवळपास एका वर्षानंतर भारतीय संघात कमबॅक करणाऱ्या आर. अश्विनने आफ्रिकेच्या फलंदाजांना चांगलेच त्रस्त केले. आफ्रिकेच्या पहिल्या डावात त्याने १४५ धावा खर्च करुन ७ बळी टिपले. अश्विनच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताने आफ्रिकेचा पहिला डाव ४३१ धावांवर रोखत ७१ धावांची आघाडी घेतली.  

बीडच्या अविनाश साबळेला ऑलिम्पिकचं 'तिकीट', मोडला स्वतःचाच विक्रम

दुसऱ्या दिवसातील अखेरच्या सत्रात अश्विनच्या फिरकीत कमालीची जादू पाहायला मिळाली. त्याने आफ्रिकेला तीन धक्के देत आफ्रिकेच्या अडचणी वाढवल्या. तिसऱ्या दिवशी त्याने तीन बळी मिळवत २७ वेळा पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स मिळवण्याचा पराक्रम आपल्या नावे नोंदवला. चौथ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात दोन बळी मिळवत त्याने आफ्रिकेचे काम तमाम केले.  

'महिलांकडे पाहण्याची ही मानसिकता बरी नव्हे'

या कामगिरीच्या जोरावर तो विश्व विक्रमाच्या उंबरठ्यावर पोहचला आहे. कसोटीमध्ये सर्वाधिक जलद ३५० बळी मिळवण्याचा विक्रम अश्विनला खुणावत आहेत. विशाखापट्टणमच्या मैदानातील ७ बळी मिळवल्यानंतर अश्विनच्या खात्यात ३४९ विकेट्सची नोंद झाली आहे. अश्विनचा हा ६६ वा कसोटी सामना आहे. एक बळी मिळवून त्याला श्रीलंकेचा फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी आहे. 
उल्लेखनिय आहे की, मुथय्या मुरलीधरनने ६६ कसोटी सामन्यात ३५० बळी टिपण्याचा पराक्रम केला होता. हा एक विश्व विक्रमच आहे. न्यूझीलंडच्या रिचर्ड हेडली यांनी ६९ कसोटीत ३५० बळी मिळवले होते.