पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IND vs SA :... म्हणून या पिच क्यूरेटरची असेल खरी 'कसोटी'

पांडुरंग साळगांवकर

India vs South Africa, 2nd Test at Pune: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गुरुवारी (१० ऑक्टोबर) पासून दुसरा कसोटी सामन्याला सुरुवात होत आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे मैदानावर होणाऱ्या सामन्यावर पावसाचे गडद सावट आहे. पावसाने उसंत घेतली आणि सामना झालाच तर रोहित, विराट किंवा रबाडा, क्विंटन डी कॉक या क्रिकेटरांपेक्षा सामन्यासाठी खेळपट्टी तयार करणाऱ्या (पिच क्यूरेटर) पांडुरंग साळगांवकर यांच्यावर सर्वांच्या नजरा असतील. २०१२ मध्ये आयपीएलपासून साळगांवकर यांच्याकडे खेळपट्टीची जबाबदारी आहे.   

INDvsSA: ऐतिहासिक शहरातील मैदानात टीम इंडियाला इतिहास घडवण्याची संधी

पुण्याच्या मैदानातील हा दुसरा कसोटी सामना असून खेळपट्टी कशी असेल? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. याच प्रमुख कारण म्हणजे यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळपट्टीवरुन चांगलेच वादंग उठल्याचे पाहायला मिळाले होते. अडीच वर्षांपूर्वी २०१७ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना तीन दिवसांच्या आतच निकाली लागला होता. तेव्हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाने खेळपट्टी खराब असल्याची तक्रार आयसीसीकडे केली होती. या सामन्यात फिरकीपटूंनी तब्बल ३१ बळी टिपले होते. त्यात नॅथन लायन ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला होता. 

INDvSA: दुसरी कसोटी पुण्यात, पण पाण्यात तर नाही ना जाणार?

खेळपट्टीसंदर्भात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीनंतर माजी राष्ट्रीय निवड समितीचे अधक्ष सुरेंद्र भावे यांना साळगांवकरांच्या सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. भावे यांच्या कारकिर्द देखील वादग्रस्त अशीच आहे. ऑक्टोबर २१०७ मध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या  'पिच फिक्सिंग' प्रकरणात त्यांचे नाव जोडले गेले होते. त्यांच्यावर ६ महिन्यांच्या निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली होती.  

पावसाचा लपंडाव 
भारतीय संघ कशी कामगिरी करणार?,  खेळपट्टी कशी असेल यादृष्टिने हा सामना महत्त्वपूर्ण असताना पाऊस बॅटिंग करायचे थांबणार का? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल. हवामान खात्याच्या अंदाजानुसार दोन-तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा अंदाज खरा ठरला तर पुण्यातील मैदानात पाच दिवस खेळ रंगल्याचे चित्र धुसर होऊ शकते.  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: India vs South Africa Pune pitch in focus as curator Pandurang Salgaonkar gets ready for 2nd Test