पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvSA: या ताफ्यासह आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार

फाफ ड्युपेप्लेसीचं कमबॅक, रबाडाचा समावेश नाही

भारत दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. आयपीएलपूर्वी भारतात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. १२ मार्चपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. माजी कर्णधार फाफ ड्युप्लेसीला देखील संघात स्थान मिळाले असून त्याच्यासह  रस्सी वॅन-डर डुसेन हा देखील आफ्रिकेच्या ताफ्यातून दौऱ्यावर येणार आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरीच्या जोरावर फिरकीपटू जॉर्ड लिंडे याला देखील १५ सदस्यीय संघात स्थान देण्यात आले आहे.  

आक्रमकपणाच्या प्रश्नावर कोहली पत्रकारावर चिडला

२८ वर्षीय लिंडेने स्थानिक क्रिकेटमध्ये मर्यादित षटकातील सामन्यात प्रभावी कामगिरी करुन निवड समितीचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. याशिवाय मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये भारत दौऱ्यावर त्याने रांचीच्या मैदानातील कसोटीत त्याने चार विकेट्स मिळवल्या होत्या. तबरेज शम्सीच्या जागेवर त्याला संघात स्थान मिळाले आहे. याशिवाय केशव महाराज देखील आफ्रिकेच्या ताफ्यात समावेश आहे. क्विंटन डि कॉकच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेचा संघ १२ मार्चला धर्मशाला, १५ मार्चला लखनऊ तर १८ मार्चला कोलाताच्या मैदानात भारतीय संघासोबत भिडणार आहे. ते कशी कामगिरी करणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.  

IndvsNZ: भारतावर व्हाईटवॉशची नामुष्की, न्यूझीलंडचा दणदणीत विजय

दक्षिण आफ्रिकेचा संघ :  क्विंटन डिकॉक (कर्णधार), टेम्बा बव्हुमा, रस्सी वॅन-डर डुसेन , फाफ डु प्लेसी, कायल वेरेन, हेन्री क्लासें, डेविड मिलर, जेजे स्मट्स, एंडिले फेहलुकवायो, लुंगी एनगिडी, लुथो सिपाम्ला, ब्यूरेन हेंड्रिक्स, एनरिच नोर्ट्जे, जॉर्ज लिंडे, केशव महाराज.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:India vs South Africa ODI Series South Africa announce squad for ODI series against India Faf du Plessis returns