दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशी होणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी रविवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. सलामीवीर शिखर धवन आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून एकदिवसीय संघात पुनरागमन करत असून सलामीवीर रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. धवन पांड्याशिवाय भुवनेश्वर कुमारलाही भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर झालेल्या दुखापतीतून रोहित शर्मा अद्याप सावरला नसल्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आल्याचे समजते.
INDvs Aus: क्रिकेट जगतात ऑस्ट्रेलियन महिलाच ठरल्या भारी!
शिखर धवन, हार्दिक पांड्या आणि भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर होते. तिन्ही अनुभवी फलंदाज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मैदानात उतरणार असून ते कशी कामगिरी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. याशिवाय भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली शतकी बाज मायदेशात पुन्हा पाहायला मिळणार का याकडेही क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असेल.
कोरोना: दादा ठाम असताना राज्याचे मंत्री म्हणाले, आता IPL स्पर्धा नकोच!
धवनची संघात वर्णी लागल्यामुळे मयांक अग्रवालला डच्चू मिळाला आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर मिळालेल्या संधीच सोन करण्यात त्याला अपयश आले होते. त्याचा फटकाच त्याला बसल्याचे दिसते. दुसरीकडे पृथ्वी शॉची सकारात्मक खेळ शैलीवर निवड समितीने पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर पृथ्वी शॉ मोठी खेळी करु शकला नव्हता. पण त्याने आपल्यातील आक्रमक शैलीची झलक दाखवून दिली होती.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना धर्मशालामध्ये रंगणार असून दुसरा सामना लखनऊ तर तिसरा आणि अखेरचा सामना हा कोलकाताच्या ईडन गार्डनच्या मैदानात रंगणार आहे.
दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ
शिखर धवन, पृथ्वी शॉ, विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, मनीष पांडे. श्रेयस अय्यर. ऋषभ पंत. हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा. भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैन, कुलदीप यादव, शुभमन गिल