पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धोनीची निवड का झाली नाही, एमएसके प्रसाद यांनीच सांगितलं कारण

एमएसके प्रसाद आणि महेंद्रसिंह धोनी

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी दक्षिण आफ्रिकेविरोधातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत दिसणार नाही. गुरुवारी भारतीय निवडकर्त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यातील टी २० मालिकेसाठी संघाची निवड जाहीर केली. संघात अष्टपैलू हार्दिक पांड्याचे पुनरागमन झाले आहे. परंतु, पुन्हा एकदा संघात धोनीचा समावेश करण्यात आलेला नाही. 

अंबाती रायडूचा यू-टर्न, निवृत्तीचा निर्णय मागे

'इंडिया टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार, निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी स्वतःच याचा खुलासा केला आहे. धोनी निवडीसाठी उपलब्ध नव्हता, असे त्यांनी सांगितले. यापूर्वी, धोनीने विश्वचषकानंतर विंडीज दौऱ्यातही भाग घेतला नव्हता. त्याने भारतीय लष्कराबरोबर प्रशिक्षण घेण्यास प्राधान्य दिले होते. त्यामुळे तो विंडीज दौऱ्यावरही जाऊ शकला नव्हता.

धोनी सध्या अमेरिकेत आहे. पण धोनीने यावेळी विश्रांती का घेतली याचा खुलासा झालेला नाही. धोनी संघात नसल्यामुळे सर्वांच्या नजरा ऋषभ पंतच्या कामगिरीवर टिकून असतील.

INDvsSA T-20 : पांड्याचे पुनरागमन धोनी बाहेरच

दक्षिण आफ्रिकेविरुद्धाच्या ३ सामन्यांच्या टी २० मालिकेसाठी भारताचा २५ सदस्यीय संघ असाः विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), के एल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, क्रुणाल पांड्या, वॉश्गिंटन सुंदर, राहुल चहर, खलील अहदम, दीपक चहर, नवदीप सैनी.