पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मिताली 'राज'! तेंडुलकर, मियादांद अन् जयसूर्या या दिग्गजांच्या यादीत

मिताली राज आणि सचिन तेंडुलकर

India vs South Africa, Women Cricket, 1st ODI: भारतीय महिला क्रिकेटर मिताली राजने आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला. तिने क्रिकेट कारकिर्दीत २० वर्षांचा कालावधी पूर्ण केला. तिने २६ जून १९९९ मध्ये दक्षिण अफ्रीकेविरुद्धच्या सामन्याने एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली होती. 

बुधवारी वडोदरा येथील रिलायन्स स्टेडियमवर दक्षिण अफ्रीकेविरुद्ध मैदानात उतरताच एकदिवसीय क्रिकेटमध्ये २० वर्ष आणि १०५ दिवसांचा कालावधी पूर्ण केला. क्रिकेटच्या मैदानात दोन दशक राज्य करणारी मिताली राज एकमेव महिला क्रिकेटर आहे. तिने २०३ सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. इंग्लंडची चार्लेट एडवर्ड १९१, भारताची झूलन गोस्वामी १७७, ऑस्ट्रेलियाची एलेक्स ब्लॅकवेल आणि इंग्लंडची जेनी गन यांनी प्रत्येकी १४४ सामने खेळले आहेत.  

Pune Test : जाळीतील सरावात विराट सापडला जडेजाच्या जाळ्यात

क्रिकेटच्या मैदानात सर्वाधिक मोठी कारकिर्द ही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. सचिन तेंदुलकरने २२ वर्ष आणि ९१ दिवस भारतीय संघाला योगदान दिले आहे. या यादीत श्रीलंकेचा सनथ जयसूर्या दुसऱ्या स्थानावर आहे. त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दी २१ वर्ष १८४ दिवस इतकी असून त्यापाठोपाठ पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियांदाद २० वर्ष आणि २७२ दिवस मैदान गाजवण्याचा पराक्रम केला आहे. 

या दिग्गजांच्या यादीत आता मिताली राजने स्थान मिळवले आहे. ३६ वर्षीय मितालीने आतापर्यंत १८४ डावात ६ हजार ७३१ धावा केल्या आहेत. महिलामध्ये एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावसंख्या उभारण्याचा विक्रम मितालीच्या नावे आहे. वयाच्या १६ व्या वर्षी मितालीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले पहिले शतक झळकावले होते. एकदिवसीय महिला क्रिकेटमधील तिचा हा विक्रम आजही अबाधित आहे.  मितालीने २००४-१३ दरम्यान सातत्यपूर्ण १०९ सामने खेळले होते. हा देखील एक विक्रमच आहे. भारतीय संघाची ती सर्वात युवा कर्णधार देखील राहिली आहे. भारतीय महिला संघाकडून सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार पटकावण्याचा विक्रमही मितालीच्या नावे आहे. जागतिक महिला क्रिकेटचा विचार करता ती दुसऱ्या स्थानावर आहे.  

ICC WTC : गुणपद्धती विषयी विराटच्या मनात 'खदखद'

भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ८ विकेट्स राखून विजयी सलामी दिली. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण अफ्रीकेच्या महिला संघाने ४५ षटकात १६४ धावा केल्या होत्या. भारतीय महिलांनी हे आव्हान ४१.४ षटकात पार करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.  या सामन्यात प्रिया पुनिया (नाबाद ७५) आणि जेमिमा रोड्रिग्स ५५ धावांची खेळी केली. मिताली राज ११ धावांवर नाबाद राहिली.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: india vs south africa Mithali Raj 1st woman to complete 20 years in International cricket equals Sachin Tendulkar Javed Miandad and Sanath Jayasuriya