पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsSA Day 1 Stumps : भारत ३ बाद २२४ धावा (५८)

रोहित शर्माचे दमार शतक

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात आघाडी कोलमडल्यानंतर सलामीवीर रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेने भारताचा डाव सावरला. रोहित शर्माने मालिकेत आणखी एक शतक झळकावत कसोटीतील आपले सहावे शतक पूर्ण केले. त्याने षटकारने शतकाला गवसणी घातली. त्याला अजिंक्य रहाणे उत्तम साथ देत आहे. भारताच्या पहिल्या डावातील ५८ षटकांच्या खेळानंतर भारताच्या धावफलकावर ३ बाद २२४ धावा असताना पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवण्यात आला. त्यानंतर अधूंक प्रकाशामुळे अखेर दिवसांचा डाव ३२ षटके बाकी असतानाच थांबवण्याचा निर्णय पंचांनी घेतला. पहिल्या दिवसाखेर रोहित शर्मा (११७)* आणि अजिंक्य रहाणे (८३)* धावांवर नाबाद आहेत. 

तिसरा कसोटी सामना रांचीच्या मैदानात सुरू आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदांजी करणाऱ्या भारताची सुरूवात खराब झाली. रबाडाने सलामीवीर मयंक अग्रवालच्या रूपात भारताला  पहिला धक्का दिला. त्याने १९ चेंडूत २ चौकाराच्या मदतीने १० धावा केल्या. पुजाराला रबाडाने खातेही उघडू दिले नाही. धावफलकावर १६ धावा असताना  भारताला  दुसरा धक्का बसला. त्यानंतर विराट कोहलीही १२ धावा करुन तंबूत परतला. ३ बाद ३९ धावांवरुन अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा या जोडीने  भारताला दोनशे धावांचा टप्पा पार करुन देत आफ्रिकेच्या गोलंदाजांचे मनसुबे उधळून लावले. या जोडीच्या खेळाच्या जोरावर भारताने पहिल्या दिवशी खराब सुरुवातीनंतर देखील आफ्रिकेला बॅकफूटवर टाकले.

India vs South Africa Live updates 

-खेळात पावसाचा व्यत्यय

- रोहतने षटकाराने साजरे केले सहावे कसोटी शतक  

- रोहित शर्माचं अर्धशतक, भारताची धावसंख्या ११८, ३ बाद 

- लंच ब्रेकआधी भारताची धावसंख्या ७१, ३ गडी बाद

- भारताला तिसरा झटका, विराट कोहली बाद 

- भारताची खराब सुरूवात, २९ धावा दोन गडी बाद 

- चेतेश्वर पूजारा बाद

- मयांक अग्रवाल बाद