पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IND vs SA : पुण्यात भारताचा एक डाव अन् १३७ धावांनी ऐतिहासिक विजय

भारताचा दणदणीत विजय

पुण्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला एक डाव आणि १३७ धावांनी पराभूत करत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशा आघाडीसह मालिका खिशात घातली आहे. कर्णधार विराट कोहलीचे द्विशतक, मयंक अग्रवालची शतकी खेळी आणि जेडेजा आणि अजिंक्य रहाणेच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ५ बाद ६०१ धावांचा डोंगर रचला होता. दक्षिण आफ्रिकेला दोन्ही डावात मिळूनही या धावांपर्यंत पोहचता आले नाही. भारताने घरच्या मैदानावर सलग अकरावा विजय नोंदवत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.

INDvsSA Day 3 Stumps: फिलँडर-महाराज जोडीनं दमवलं!

तिसऱ्या दिवसाखेर भारताने आफ्रिकेचा पहिल्या डाव २७५ धावांवर आटोपला होता. त्यानंतर चौथ्या दिवशी कर्णधार विराटने आफ्रिकेला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. मार्करम-एल्गरने आफ्रिकेच्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली. ईशांत शर्माने मार्करमला खाते उघडू दिले नाही. डेन एल्गरने आफ्रिकेकडून सर्वाधिक ४८ धावांची खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही फलंदाजांना भारतीय गोलंदाजांसमोर तग धरता आला नाही. परिणामा आफ्रिकेचा दुसरा डाव १८९ धावांत आटोपला.

 LIVE UPDATES: 

- क्विंटन डी कॉकचा अडथळा रवींद्र जडेजाने दूर केला. जडेजाने त्याचा ५ धावांवर त्रिफळा उडवला.

-  दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशीच्या उपहारापर्यंत भारताने आफ्रिकेच्या चार महत्त्वाच्या विकेट घेतल्या आहेत. भारत विजयापासून सहा विकेट दूर आहे.

- मैदानात टिच्चून फलंदाजी करत असलेल्या डीन एल्गरला अश्विनची फिरकी समजली नाही. तो उमेश यादवकडे झेल देऊन बाद झाला.

- फिरकीपटू आर अश्विनने भारताला मोठे यश मिळवून देताना कर्णधार ड्यू प्लेसिसला तंबूत धाडले. ७० धावसंख्येवर आफ्रिकेची तिसरी विकेट पडली.

- कर्णधार फाफ ड्यू प्लेसिस आणि डीन एल्गर हे बचावात्मक पवित्र्यात दिसले. १७ षटकानंतर संघाची धावसंख्या दोन गड्यांच्या बदल्यात ५९ धावा केल्या.

- दुसरी विकेट घेण्यासा भारताला वेळ लागला नाही. उमेश यादवच्या चेंडूवर विकेटकीपर ऋद्धिमान साहाने डाव्या बाजूला डाइव्ह मारुन दि ब्रूयनचा झेल टिपला.

- पहिल्या डावात ३२६ धावांनी पिछाडीवर असलेल्या आफ्रिकेच्या दुसऱ्या डावाची सुरुवातही निराशाजनक ठरली. सलामीवीर एडेन मार्करम पहिल्या डावाप्रमाणेच याही डावात शून्यावर बाद झाला. वेगवान गोलंदाज इशांत शर्माने त्याची विकेट घेतली. 

- भारताने द. आफ्रिकेला फॉलोऑन देऊन पुन्हा एकदा फलंदाजी देऊ केली. द. आफ्रिका पहिल्या डावात ३२६ धावांनी पिछाडीवर आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:india vs south africa live ind vs sa 2nd test day 4 live cricket score live match updates from mca pune sa vs ind full scorecard