पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोहलीने सर डॉन ब्रॅडमन यांचा ७१ वर्षांपूर्वीचा विक्रमही टाकला मागे

विराट कोहली

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर रंगलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी विराट कोहलीने कमालीची कामगिरी केली. या सामन्यात द्विशतकाचा पल्ला गाठताना त्याने आपल्या नावे अनेक विक्रम नोंदवले. यात ७१ वर्षांपासून अबाधित असलेल्या सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मागे टाकण्याचा पराक्रमही कोहलीने केला आहे. 

 

पुण्यात रनमशीन बरसली! सचिन, सेहवागचा विक्रम टाकला मागे

कर्णधार विराट कोहली १५०+ धावा करत सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मागे टाकला. संघाचे नेतृत्व करताना सर्वाधिक वेळा १५०+ धावसंख्या उभारण्याचा विक्रम सर डॉन ब्रॅडमन यांच्या नावे होते. कोहलीने त्यांचा हा विक्रम मागे टाकला आहे. विराट कोहली आतापर्यंत ९ वेळा १५० पेक्षा अधिक धावा करण्यात यशस्वी ठरला आहे. यापूर्वी हा सर डॉन ब्रॅडमन आणि विराट कोहली संयुक्तपणे अव्वलस्थानी होते. 

IND vs SA : किंग कोहलीची रिकी पॉटिंगच्या विक्रमाशी बरोबरी

२०१४ च्या अखेरीस भारताच्या नेतृत्वाची जबाबदारी कोहलीच्या खांद्यावर पडली. महेंद्रसिंह धोनीने कसोटीमधून निवृती घेतल्यापासून कोहली कसोटी संघाची धूरा सांभाळत आहे. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दमदार कामगिरी करत आहे. याशिवाय स्वत: कोहलीचा खेळही बहरदार झाल्याचे पाहायला मिळाले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ १-० असा अघाडीवर असून दुसऱ्या कसोटीतही भारताचे पारडे वर्चढ दिसत आहे. विराट कोहलीने पहिल्या डावात ३३६ चेंडूत नाबाद २५४ धावांची दमदार खेळी केली. यात त्याने ३३ चौकार आणि २ षटकार खेचले.